सांगली जिल्हा बॅंकेला १०५ कोटींचा नफा

सांगली जिल्हा बॅंकेला १०५ कोटींचा नफा
सांगली जिल्हा बॅंकेला १०५ कोटींचा नफा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला आर्थिक वर्षात १०५ कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. नफावाढीचे प्रमाण ४४.०७ टक्के आहे. रिझर्व्ह बॅंक व नाबार्डच्या निकषानुसार बॅंक राज्यात प्रथम क्रमांकावर येण्यात अडचण नाही, अशी माहिती अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. 

दिलीप पाटील म्हणाले, ‘‘दुष्काळ, कर्जमाफीतील संदिग्धता, ऊसबिलापोटी कारखान्यांकडून मिळालेल्या कमी दरामुळे शेतीकर्ज थकबाकीत वाढ झाली. कर्ज व इतर व्यवहारांत वाढ झाल्यामुळे ढोबळ नफा वाढला. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४४.०७ टक्के आहे. गतसालचा क्रेडिट प्लॅन २१०० कोटींचा होता. बॅंकेचे उद्दिष्ट १०१० कोटी म्हणजे ४८.१० टक्के होते. एक लाख २५ हजार ८४६ शेतकऱ्यांना ८२७.३७ कोटींचा कर्जपुरवठा केला. जिल्ह्याच्या कर्ज वितरणाशी प्रमाण ४० टक्के, तर शेतकरी संख्येचे प्रमाण ७० टक्के आहे.’’

बँकेने ५०० दिवसांची धनवर्षा ठेव योजना सुरू केली. ५७८ कोटी ७५ लाखांच्या ठेवी जमा झाल्या. सलग पाच वर्षे लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळवला. यंदाही अडचण नाही. मुख्यालयासह २१७ शाखांचे कोअर बॅंकिंग झालेय. सीबीएस संगणकीकरणाच्या माध्यमातून सुविधा दिल्या आहेत. ३२ ठिकाणी एटीएम सेवा आहे. एक लाख ५५ हजार रूपे डेबिट कार्ड व एक लाख ६७ हजार ५२५ रूपे केसीसी कार्डाचे वितरण केलेय. इमिजिएट पेमेंट सिस्टीम, मोबाईल, नेट बॅंकिंगसारख्या सुविधा दिल्या जातील. अद्ययावत वेबसाइट बनवली आहे. मिस्ड कॉल ऍलर्ट सेवाही सुरू केलेय. १०५ कोटींचा नफा पाहिला तर बॅंक राज्यात प्रथम क्रमांकावर येईल.

७६४ विकास सोसायट्या बँकेला ऑनलाइन जोडणार  पाटील म्हणाले, ‘‘नाबार्डकडून मान्यता मिळाल्यानंतर विकास सोसायट्यांचे संगणकीकरण केले जाईल. जिल्ह्यातील सर्व ७६४ सोसायट्या जिल्हा बँकेला ऑनलाइन जोडल्या जातील. अनिष्ट तफावतीतील संस्थांना इष्ट तफावतीत आणले जाईल.’’

८ संस्थांवर कारवाईची प्रक्रिया  आठ मोठ्या संस्थांवर ‘सिक्‍युरिटायझेशन’ ॲक्‍टखाली कारवाई सुरू आहे. या संस्थांकडे ११६ कोटी ४४ लाख रुपये थकबाकी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com