सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना

सुरवातीच्या पावसावर भरवसा ठेवून बाजरी, तूर, सूर्यफूल, मुगाची लागवड केली. गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. तीन ते चार वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना जीवन जगणे मुश्कील झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने दुष्काळी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी. -शिवाजी भुसनूर-पाटील,लकडेवाडी, ता. जत
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना

सांगली : खरिपाच्या प्रारंभी पडलेल्या पेरणी योग्य पावसामुळे जत तालुक्‍याच्या काही भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी केली. पण त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे खरीप हंगाम धोक्‍यात आला आहे. पिके माना टाकू लागली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. येत्या दोन - चार दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना उभ्या  पिकांत नांगर फिरवावा लागेल, अशी शक्यता आहे.

खरिपातील बाजरी, मूग, तूर इत्यादी पिके धोक्‍यात आली आहेत. ती जगवण्यासाठी पावसाची आवश्‍यकता आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाची रिमझिम झाली. त्यामुळे पिकांची वाढ झाली. पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी देवून पिके जगवली. परंतु आता पाणी संपल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. जमिनीतील ओलावा कमी होऊन पिके पिवळी पडली आहेत. 

तालुक्‍याची पावसाची वार्षिक सरासरी ४५७.७ मिलिमीटर आहे. आतापर्यंत १६८. ५० मिमी पाऊस झाला आहे. एप्रिलमध्ये ८.३८ , मे मध्ये १६.३८, जूनमध्ये ६९.६५, जुलै ६०.९४, तर पाच ऑगस्टपर्यंत १३.१६ मिलिमीटर पाऊस झाला. जून व जुलै महिन्यात एखादा-दुसरा अपवाद वगळता भुरभुरत्या पावसानेच सातत्याने हजेरी लावली. यामुळे केवळ पिके जगली. रिमझिम पाऊसही सर्वदूर नसल्याने हलक्‍या रानावरील पिके आता हातची जाऊ लागली आहेत. पिके अनेक रोगांना बळी पडत आहेत. त्यांच्यावरील फवारणीचा खर्च ही शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com