agriculture news in marathi, Sangli district in drought-hit | Agrowon

सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेत
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

सांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ उणे पंधरा टक्के पाऊस झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप पूर्णपणे धोक्यात आहे. हंगामातील ६५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. दुबार पेरण्याबरोबर खरीप वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. उर्वरित कालावधीत समाधानकारक पाऊस न पडल्यास परिस्थिती गंभीर होईल. अपेक्षित पावसाअभावी सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्याची दुष्काळाकडे वाटचाल सुरू आहे. 

सांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ उणे पंधरा टक्के पाऊस झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप पूर्णपणे धोक्यात आहे. हंगामातील ६५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. दुबार पेरण्याबरोबर खरीप वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. उर्वरित कालावधीत समाधानकारक पाऊस न पडल्यास परिस्थिती गंभीर होईल. अपेक्षित पावसाअभावी सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्याची दुष्काळाकडे वाटचाल सुरू आहे. 

मृग नक्षत्र कोरडे गेले. पावसाला उशिरा सुरवात झाली. दीड महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात उणे १५ टक्के पाऊस झाला. ही आकडेवारी चिंताजनक आहे. वास्तविक पाहता दुष्काळी पट्टा सोडून वाळवा, मिरज, शिराळा, पलूस, कडेगाव तालुक्यात पेरणी झाली. मात्र, दुष्काळी पट्ट्यात एक, दोन पावसावर पेरणी झाली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अजूनही या भागातील शेती पेरणीविना तशीच पडून आहे. चार-आठ दिवसांत पाऊस पडला नाही, तर हंगामा वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे बळिराजा चिंतेत आहे.  

टॅंकरने फळबागा जगविल्या 

जिल्ह्याला मागील दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहेत. जिल्ह्यातील जत, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव या दुष्काळी तालुक्यात कमी पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेले. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. या भागातील शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी घालून द्राक्ष, डाळिंब बागा जगविल्या. तरीही हाती काहीच लागले नाही. 

भूगर्भातील पाणीपातळी ‘जैसे थे’

शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५४४ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. आटपाडीत ९३ मिलिमीटर, जतमध्ये ७६, कवठेमहांकाळ येथे ८८, तर तासगाव तालुक्यात १३३  मिलीमीटर पाऊस झाला. परंतु या पावसाने भूगर्भातील पाण्याची पातळीत वाढ झाली नसल्याची स्थिती आहे.

इतर बातम्या
राज्य बॅंक प्रकरणात मोहिते पाटील, सोपलसोलापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
विश्वी येथे शेतीशाळेत मिळताहेत...बुलडाणा ः मेहकर तालुक्यातील विश्वी येथे शेतीशाळा...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनवर काळ्या...हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील केलसुलासह (ता....
राष्ट्रीय जलधोरणात शेतकऱ्यांना...भंडारा ः ‘नदी जोड प्रकल्पाला प्राधान्य...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
खानदेशात कांदा लागवड सुरूजळगाव  ः खानदेशात लाल कांद्याची लागवड सुरू...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
सोलापूर येथे शेतकरी मानधन योजनेच्या...सोलापूर : पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेतील नोंदणीस...
रामदास चारोस्कर यांचा शिवसेनेत प्रवेश नाशिक : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...
पूरग्रस्त शेतकऱ्यांना कुळीथ, वालाचे...रत्नागिरी : या वर्षी पडलेल्या मुसळधार...
मराठवाड्यातील मध्यम, लघुप्रकल्पांत २९...औरंगाबाद : अर्धेअधिक पावसाळा लोटल्यानंतरही...