सांगली जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे ८४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

 In Sangli district, due to irrigation an area of ​84,000 hectares will be irrigated
In Sangli district, due to irrigation an area of ​84,000 hectares will be irrigated

सांगली ः शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक गावांतील पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत ५२४ गावांत १९ हजार ५७३ कामे झाली आहेत. 

यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या तलाव, बंधारे यांसह अनेक कामे १ लाख २६ हजार ८७१ टीसीएम (हजार घनमीटर) म्हणजेच ४.४८ टीएमसी (अब्ज घनफूट) पाणीसाठा झाला असून ८४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविली आहे. प्रामख्याने दुष्काळी पट्ट्यातील अनेक गावांचा समावेश या योजनेत केला होता. सन २०१५ मध्ये जिल्ह्यासह दुष्काळी पट्ट्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे या योजनेमार्फत केलेल्या कामांत पाणीसाठा झाला होता. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला होता. 

पाणीटंचाईवर मात झाली होती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून जिल्‍ह्यासह दुष्काळी पट्ट्यात पावसाने सरासरीही पार केली नव्हती. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनांच्या कामात पाणीसाठा झाला नव्हता. जिल्ह्यात सन २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत जलयुक्त शिवारसाठी २७६ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या योजनेत ५२४ गावांचा सहभाग होता. सुमारे १ लाख ६९ हजार १३१ टीसीएम पाणी साठवणुकीची क्षमता झाली आहे.

मात्र, यंदा पावसाने गेल्या वीस वर्षांची सरासरी मागे टाकली आहे. यंदा ८९८७ मिलिमीटर पाऊस म्हणजे १७६ टक्के इतका पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या पावसाने जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारामुळे तलाव, बंधारे, ओढे यांसह अनेक ठिकाणी पाणी साठले आहे.

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेली कामे
वर्ष गावांची संख्या एकूण कामे पाणी क्षमता सिंचनाखाली येणारे क्षेत्र (हेक्टर)
२०१५-१६ १४१ ४ हजार ६४८ ५५ हजार २२० टीसीएम २७ हजार ६१०
२०१६-१७ १४० ४ हजार ३२१ ५४ हजार ४४८ टीसीएम २७ हजार २४४ हेक्टर
२०१७-१८ १४० ७ हजार ९४६ ४५ हजार ९२८ टीसीएम २२ हजार ९६४ हेक्टर
२०१८-१९ १०३ २ हजार ६५८ १३ हजार ५६५ ६ हजार ७८२ हेक्टर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com