सांगली जिल्ह्यात शेतीचे १२०० कोटींचे नुकसान

सांगली जिल्ह्यात शेतीचे १२०० कोटींचे नुकसान
सांगली जिल्ह्यात शेतीचे १२०० कोटींचे नुकसान

सांगली : महापुरामुळे जिल्ह्यात शेतीचे ६६ हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. त्यापैकी ९५ टक्के क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार १ हजार २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घरे, वीज, पायाभूत सुविधा, व्यापारी नुकसान, सानुग्रह अनुदानवाटप आदींचे ७५० ते ८०० कोटींचे नुकसान झाले. शेती आणि अन्य नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.   जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सांगली शहरासह चार तालुक्यांतील १०४ गावांना फटका बसला होता. महापूर ओसरल्यापासून पंचनामे, मदतवाटप गतीने सुरू आहे. पडलेले विजेचे खांब, पायाभूत सुविधा, सानुग्रह अनुदानवाटप, पडलेली घरे, अंशतः पडलेली घरे तसेच शासकीय इमारतींचे ३३८ कोटीचे नुकसान झाले. शेतीचे ६६ हजार हेक्‍टरपैकी ९५ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. शेती पिकांच्या नुकसानीत सर्वाधिक नुकसान उसाचे म्हणजे ३६ हजार हेक्‍टर क्षेत्रातील झाले आहे. त्यानंतर मका, सोयाबीन, केळी, द्राक्षांसह अन्य क्षेत्राचा समावेश आहे. पिकांचे नुकसान काढताना सरासरी उत्पन्न आणि हमीभावाप्रमाणे काढण्यात आले आहे. सद्यःस्थितीत यापेक्षाही आणखी नुकसान वाढू शकते. जिल्ह्यातील १०४ गावांतील ग्रामीण भागातील भागातील ४३ हजार ४९२ व शहरी भागातील ४० हजार ९३६ कुटुंबांना ४२ कोटी २१ लाख ४० हजार सानुग्रह अनुदान वाटले आहे. ग्रामीण भागातील ३४ हजार ३९७ व शहरी भागातील ४४९० कुटुंबांना ५ हजार रुपये वजा जाता उर्वरित २१ कोटी ६८ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आली आहे. ७९ हजार १६८ कुटुंबांना एकूण ७९१६.८ क्विंटल गहू व ७९१६.८ क्विंटल तांदूळ मोफत वाटले आहे. बाधित कुटुंबांना ५ लिटरप्रमाणे ३ लाख १ हजार ३२० लिटर केरोसीन वाटले आहे.  जिल्ह्यातील आत्तापर्यंत ९ हजार ३९१ घरांची पूर्णतः पडझड झाली आहे, तर १८ हजार ६३६ घरांची अंशतः पडझड झाली. शिवाय १९२३ गोठ्यांना पुराची झळ बसली आहे. १४६ झोपड्या पडल्या आहेत. महापुरामुळे जिल्ह्यातील २४९ गावांतील १ लाख २० हजार २३१ बाधित शेतकऱ्यांचे अंदाजे ६६०९८.५० हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी ९९ हजार ६९८ शेतकऱ्यांच्या ५०८३३.६१ हेक्‍टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आले आहेत. ६२ हजार १४५ अशा पशुधनाचे नुकसान झाले. त्याचे १.४३ कोटींचे नुकसान झाले. जिल्हाभरातील २९० दुधाळ जनावरे, बैल, कोंबड्या व कुक्कुट वर्गीय प्राण्यांच्या नुकसानीबद्दल ९३ लाख ७१ हजार अनुदान वाटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com