सांगली जिल्ह्यात खरिपाची ७४ टक्के पेरणी

सांगली जिल्ह्यात खरिपाची ७४ टक्के पेरणी
सांगली जिल्ह्यात खरिपाची ७४ टक्के पेरणी

सांगली ः जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी ७४ टक्के झाली आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने पिकातील आंतरमशागत करण्यात व्यस्त आहेत. जत तालुक्‍यात सरासरी क्षेत्र ४४ हजार ७६७ इतके असून, ४९ हजार १२८ हेक्‍टरवर म्हणजे सर्वाधिक पेरणी तालुक्‍यात झाली आहे.

जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २ लाख ७७ हजार ६८६ हेक्‍टर असून त्यापैकी २ लाख ४ हजार ५०८ हेक्‍टरवर पेरा झाला आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने पिकात आंतरमशागत करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे.

जिल्ह्यात तुरीचे सरासरी क्षेत्र ६ हजार ९१९ हेक्‍टर आहे. दुष्काळी भागातील जत, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ या भागासह  मिरज, वाळवा, शिराळा, पलूस आणि कडेगाव तालुक्‍यांत तुरीची लागवड होते. जिल्ह्यात सुमारे ७ हजार ३८० हेक्‍टरवर तुरीची पेरा झाला आहे. अर्थात सरासरी क्षेत्राच्या ४६१ हेक्‍टरने तुरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. जत तालुक्‍यात तुरीचे सरासरी क्षेत्र १ हजार ९५५ इतके असून, तालुक्‍यात ४ हजार ५०९ इतके क्षेत्र तूर पिकाखाली आले आहे. जिल्ह्यात सूर्यफूलाचे १२८९ हेक्‍टर क्षेत्र असून, २८८ हेक्‍टरवर सूर्यफुलाची पेरणी झाली आहे.

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
पीक क्षेत्र
बाजरी १४ हजार ८८७
सोयाबीन ३८ हजार ८४६
मका २९ हजार ४०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com