Agriculture news in marathi Sangli district level technical committee recommends increase in crop loan limit | Agrowon

सांगली जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची पीक कर्जमर्यादेत वाढीची शिफारस

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

सांगली :  शेतकऱ्यांना २०२२-२३ या हंगामात दिल्या जाणाऱ्या पीककर्जाच्या मर्यादेत वाढ करण्यासाठी राज्यस्तरीय समितीकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सांगली :  शेतकऱ्यांना २०२२-२३ या हंगामात दिल्या जाणाऱ्या पीककर्जाच्या मर्यादेत वाढ करण्यासाठी राज्यस्तरीय समितीकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यंदाच्या २०२२-२३ या हंगामासाठी राज्यस्तरीय समितीकडे शिफारस केलेला पीक कर्जदर शेतकऱ्यांना पुरवठा करण्यासाठी, हंगामाचे पीक कर्जदर व धोरण ठरविण्यासाठी जिल्हा बँकेत जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची सभा झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी होते. ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक एल. पी. धानोरकर, लीड बँकेचे महेश हरणे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पाऊसमान, हवामान, भौगोलिक परिस्थिती, पीक उत्पादनासाठी येणारा खर्च, त्याला मिळणारा दर आदीची चर्चा झाली. या बाबींचा विचार करून पिकांच्या पीक कर्जदरात वाढ करावी, यासाठी राज्यस्तरीय समितीकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जदराला मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव तत्काळ राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे पाठवला जाणार आहे. तेथून मान्यता आल्यानंतरच सुधारित पीक कर्जदार लागू केला जाणार आहे.

  ...असे आहेत कर्जदर

जिल्हास्तरीय समितीने केलेल्या शिफारशीनुसार कर्जदर (एकरी) भात, सुधारित २० हजार रुपये, भात जिराईत, २० हजार रुपये, भात बासमती २० हजार रुपये, उडीद जिराईत आठ हजार ८०० रुपये, सोयाबीन २० हजार रुपये, सूर्यफूल (बागायत)- १० हजार रुपये, कापूस बागायत २२ हजार रुपये, ऊस सुरू ५० हजार रुपये, आडसाली ५६ हजार रुपये, पूर्वहंगामी ५० हजार रुपये, खोडवा ५० हजार रुपये, ज्वारी बागायत १४ हजार रुपये, द्राक्ष (थॉमसन सीडलेस) एक लाख ३० हजार रुपये, तुती लागवड सहा हजार रुपये या प्रमाणे शिफारस केली आहे. नागपुरी किंवा पंढरपुरी म्हैस एक युनिट १२ हजार रुपये मेहसाना म्हैस किंवा संकरित गायीचे एक युनिट १४ हजार रुपये या प्रमाणे कर्जदराची शिफारस केली आहे.


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...