सांगली जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांत २९ टक्केच पाणी

सांगली जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांत २९ टक्केच पाणी
सांगली जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांत २९ टक्केच पाणी

सांगली : जिल्ह्यात लघू व मध्यम प्रकल्पांची पाणीसाठा क्षमता साडेनऊ टीएमसी आहे. मात्र सध्या ऐन पावसाळ्यात पाणीसाठा केवळ २९ टक्‍क्‍यांपर्यंत आहे.  दुष्काळी भागातील २१ तलाव कोरडे आहेत. २६ तलावांत अतिशय कमी पाणी आहे. गतवर्षी २१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता, अर्थात गतवर्षीपेक्षा चालू वर्षी ८ टक्के पाणीसाठा अधिक आहे. परंतु तो जास्त असला तरीही, शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारमय असल्याचे चित्र आहे. 

दुष्काळी आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यांतील भागांत अजूनही छावण्या सुरू आहेत. १ लाख ८३ हजार लोक टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवत आहेत. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ उपसा सिंचन योजनांद्वारे कृष्णेचे पाणी दुष्काळी भागात वाहून नेता आले असते, पण कर्तृत्वाअभावी महापुरातून कर्नाटकला वाहून गेले आहे. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ या सिंचन योजना गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बंद आहेत.

या योजना सुरू असत्या आणि तलाव भरून घेतले असते, ओढे भरून वाहिले असते, तर दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्‍नच शिल्लक राहिला नसता. पावसाळ्यात दुष्काळी भागातील तलाव भरून घ्यावेत. त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, अशी मागणी गेली काही वर्षे सातत्याने होत आहे. मात्र त्याकडे केवळ आणि केवळ दुर्लक्ष होते. त्याचाच परिणाम म्हणून ऐन पावसाळ्यात दुष्काळी भागातील १.८३ लाख लोकांना टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

जत तालुक्‍यात २८ प्रकल्प आहेत. त्यामध्ये गेल्या वर्षी १२ टक्के इतके पाणी होते. परंतु यंदा केवळ चार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा यंदा आठ टक्के पाणी कमी आहे. जत तालुक्‍यातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. 

कृष्णेतून तलाव का नाही भरले  

म्हैसाळ योजनेचा मुख्य कालवा जतमधील सनमडीपर्यंत सलग तयार आहे. जत तालुक्‍यातील सुमारे २४ तलाव या पाण्याने भरून घेता येतात. जत तालुक्‍यातील संपूर्ण पश्‍चिम व उत्तर भाग तसेच दक्षिणेच्या थोड्या भागाला दिलासा मिळाला असता. तालुक्‍यातील १४ तलाव कोरडे आहेत. ७ तलावांतील पाणी अगदीच अत्यल्प (मृत साठा) आहे. तालुक्‍यातील २८ पैकी केवळ एकाच तलावात ५० ते ७५ टक्‍क्‍यांपर्यंत पाणी आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी मे महिन्यापासून बंद आहे. परिणामी ५९ गावे आणि ४४२ वाड्या वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चारा छावण्या सुरू आहेत. ताकारी, टेंभू उपसा सिंचन योजनाही दीड-दोन महिन्यांपासून बंद आहे. त्याचा फटका आटपाडी, खानापूर तालुक्‍याला बसला आहे. 

लघू, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा (दशलक्ष घन फूट)

तालुका प्रकल्प पाणीसाठा उपयुक्त साठा
तासगाव ७०८.९९ १२ टक्के
खानापूर ६६३.०४ ४१
कडेगाव ७६४.५० ९९
शिराळा १०७१.३२ १००
आटपाडी १३  १३६७.३६
जत २८ ३७१५.१० 
कवठेमहांकाळ ११  ९५६.५० १०
मिरज  १४१.६५ ७५
वाळवा २  ५१.७३ १००
एकूण ८४ ९४४०.२० २९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com