Agriculture News in Marathi In Sangli district Rabbi's sowing continues | Page 2 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली आहे. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव पूर्व भागात रब्बीचे क्षेत्र मोठे आहे.

सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली आहे. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव पूर्व भागात रब्बीचे क्षेत्र मोठे आहे. कृषी विभागाकडून पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया मोहीम राबवली जात असून, शेतकरी गटांच्या मागणीनुसार खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच केली जात आहेत. २.८० लाख हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. जिल्ह्यासाठी विविध प्रकारचे ३६ हजार २५९ क्विंटल बियाणे, १ लाख २४ हजार २३० टन खतांची मागणी केलेली आहे. 

ऑक्‍टोबरमध्ये थंडीची चाहूल होण्यापूर्वीच रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात १५१ गावे पूर्ण रब्बीची गणली जात असली, तरी खरीप आणि रब्बी पेरणीच्या गावांची संख्या २५१पर्यंत वाढली आहे. बियाण्‍यांची कमतरता, गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्ह्यात ११ पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात भौगोलिकदृष्ट्या पूर्व भागात दुष्काळी, मध्य भागात बागायती, जिरायत आणि पश्‍चिम भागात डोंगराळ भागाचा समावेश आहे. त्यात परतीच्या पावसावर रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र आटपाडी तालुक्‍यात असून, शाळू ज्वारीची पेरणी केली जाते. त्यानंतर जत, कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज पूर्व भागात रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. 

खताचे काटेकोर नियोजन 
रब्बीसाठी १ लाख २४ हजार २३० टन रासायनिक खतांची मागणी केली आहे. त्यामध्ये युरिया- ३८ हजार २३० टन, डीएपी- १८ हजार ५८० टन, एसएसपी- ११ हजार २५०, एमओपी- १० हजार ६८०, एनपीके ३५ हजार १८०, एसएसपी २८ हजार ८९० टन मागवली आहेत. रब्बीतील प्रमुख पिके अशी- ज्वारी, गहू, मका, हरभरा,करडई, सूर्यफूल कांदा आदीचा समावेश आहे. 

रब्बीचे हेक्टर क्षेत्र - २.८० लाख 
बियाण्‍यांची गुणवत्ता तपासण्यासाठी पथके तैनात - ११ 
खरीप व रब्बी पेरणीच्या गावांची संख्या - २५१ 
आतापर्यंत पेरण्या पूर्ण - ५ टक्के 

प्रतिक्रिया 
रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे. जादा दराने बियाणे, खते विक्री होत असल्यास तातडीने तालुका किंवा जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधल्यास तातडीने कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करताना पावती घेणे हिताचे ठरेल. ‘ 
- मनोजकुमार वेताळ, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली. 


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...