सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत ७७.३ टक्के जादा पाऊस

सांगली जिल्ह्यात यंदा ७७.३ टक्के जादा पाऊस
सांगली जिल्ह्यात यंदा ७७.३ टक्के जादा पाऊस

सांगली : जिल्ह्यात मान्सूनची हजेरी उशिरा लागली. तरीही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ५७८.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. गतवर्षी ३२९.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजेच यंदा ७७.३ टक्के जादा पाऊस झाला आहे. दुष्काळी पट्ट्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला. तरीही पाण्याची टंचाई कायम असल्याचे चित्र आहे.

जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नव्हता. यामुळे शेतकरी चिंतेत होते. पाऊस झाला नाही तर खरीप हंगामातील पिकांची उत्पादन कमी होईल, अशा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत होता. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यांत संततधार पावसाने हजेरी लावली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापुरामुळे सर्वत्र हाहाकार झाला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सरासरी ५७८.४ मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत २४८.६ मिलिमीटर जादा पाऊस झाला. 

जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांत दोनशे मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे तिथे तीन लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत होती; तर पशुधनासाठी शासनाने चारा छावण्या सुरू केल्या होत्या. या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये गतवर्षीपेक्षा आणखी बिकट परिस्थिती निर्माण होईल, असेच जिल्ह्यात चित्र होते. मात्र, या भागात पावसाचा जोर नसला, तरी रिमझिम पाऊस झाला आहे. परंतु तो पुरेसा नसल्याने पिके वाळून गेली आहेत. कमी पावसावर तग धरलेल्या पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. 

मिरज तालुक्यात ५९.७ टक्के, जत ४८ टक्के, खानापूर ४१.९ टक्के, वाळवा १०८.१, तासगाव १००.६, शिराळा ४१.६, आटपाडी १११.७, कवठेमहांकाळ ८५.४, पलूस ९० आणि कडेगाव तालुक्यात ८९.५ टक्के पाऊस अधिक झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सांगली जिल्ह्यातील तुलनात्मक पाऊस (मिमी)

तालुका २०१९  २०१८
मिरज  ५११.२  ३२४.७
जत  २६४.५  १४४.६
खानापूर ३०१.४ २६२.६
वाळवा ७५८.४ ३३६.७
तासगाव ४४६.७ १४९.८
शिराळा १४४३ ११५४.६
आटपाडी २४१.१ ५३.७
कवठेमहांकाळ ३६७.१  १६२.४
पलूस ५०९.२  २४२
कडेगाव ५७८.४ ३२९.८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com