Agriculture news in marathi, Sangli district receives 77.3 percent more rainfall this year | Page 2 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत ७७.३ टक्के जादा पाऊस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सांगली : जिल्ह्यात मान्सूनची हजेरी उशिरा लागली. तरीही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ५७८.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. गतवर्षी ३२९.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजेच यंदा ७७.३ टक्के जादा पाऊस झाला आहे. दुष्काळी पट्ट्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला. तरीही पाण्याची टंचाई कायम असल्याचे चित्र आहे.

सांगली : जिल्ह्यात मान्सूनची हजेरी उशिरा लागली. तरीही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ५७८.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. गतवर्षी ३२९.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजेच यंदा ७७.३ टक्के जादा पाऊस झाला आहे. दुष्काळी पट्ट्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला. तरीही पाण्याची टंचाई कायम असल्याचे चित्र आहे.

जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नव्हता. यामुळे शेतकरी चिंतेत होते. पाऊस झाला नाही तर खरीप हंगामातील पिकांची उत्पादन कमी होईल, अशा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत होता. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यांत संततधार पावसाने हजेरी लावली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापुरामुळे सर्वत्र हाहाकार झाला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सरासरी ५७८.४ मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत २४८.६ मिलिमीटर जादा पाऊस झाला. 

जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांत दोनशे मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे तिथे तीन लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत होती; तर पशुधनासाठी शासनाने चारा छावण्या सुरू केल्या होत्या. या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये गतवर्षीपेक्षा आणखी बिकट परिस्थिती निर्माण होईल, असेच जिल्ह्यात चित्र होते. मात्र, या भागात पावसाचा जोर नसला, तरी रिमझिम पाऊस झाला आहे. परंतु तो पुरेसा नसल्याने पिके वाळून गेली आहेत. कमी पावसावर तग धरलेल्या पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. 

मिरज तालुक्यात ५९.७ टक्के, जत ४८ टक्के, खानापूर ४१.९ टक्के, वाळवा १०८.१, तासगाव १००.६, शिराळा ४१.६, आटपाडी १११.७, कवठेमहांकाळ ८५.४, पलूस ९० आणि कडेगाव तालुक्यात ८९.५ टक्के पाऊस अधिक झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सांगली जिल्ह्यातील तुलनात्मक पाऊस (मिमी)

तालुका २०१९  २०१८
मिरज  ५११.२  ३२४.७
जत  २६४.५  १४४.६
खानापूर ३०१.४ २६२.६
वाळवा ७५८.४ ३३६.७
तासगाव ४४६.७ १४९.८
शिराळा १४४३ ११५४.६
आटपाडी २४१.१ ५३.७
कवठेमहांकाळ ३६७.१  १६२.४
पलूस ५०९.२  २४२
कडेगाव ५७८.४ ३२९.८

 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात ज्वारीची पावणे तीन लाख...नगर : जिल्ह्यामधील बहुतांश भागात गेल्या आठ...
साताऱ्यात जोरदार पावसाने स्ट्रॉबेरीचे...सातारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी परतीच्या...
कर्जत- जामखेडमध्ये सर्वांची प्रतिष्ठा...नगर : दोन वेळा मतविभागणीमुळे पालकमंत्री राम शिंदे...
मराठवाड्यात ११० मंडळांत पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ११०...
मुळशी तालुक्यात परतीच्या पावसामुळे...कोळवण : मुळशी तालुक्यात परतीच्या पावसामुळे...
परभणी येथील दुग्धशाळेतील दूध संकलनात घटपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
मराठवाड्यातील ५३१ गावांत, वाड्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३१ गावे-वाड्यांची तहान...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड  : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड,...
मनमाड बाजार समितीमध्ये नवीन मका विक्री...नाशिक : नांदगाव तालुक्यात मका काढणीला सुरवात झाली...
खरीप मळण्यांना पावसाचा फटकाकोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात...
शेतकरीकन्या मंजूषा पगारची भारतीय बेसबॉल...नाशिक : मालेगाव तालुक्यातील विराणे येथील शेतकरी...
खानदेशात ज्वारीची दिवाळीपूर्वी कापणी...जळगाव ः शासनाकडून भरडधान्य म्हणजेच ज्वारी, मका...
व्यापाऱ्यांकडून मुगाची कमी भावाने खरेदीनांदुरा, जि. बुलडाणा : पावसाने उघडीप दिल्याने...
‘पंदेकृवि’मध्ये जागतिक कापूस दिन साजराअकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात...
तरुणांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड...सोलापूर ः ‘‘उद्योजकता प्रशिक्षणातून शेतीपूरक...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सोयाबीन उत्पादनासाठी गंधकाचा वापर...अकोला ः शेतातील काडी कचरा न जाळता खत...
को-मार्केटिंगची पायाभरणी करणारा माजी...पुणे : "राज्यातील शेतकऱ्यांना को-मार्केटिंगच्या...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...