सांगली जिल्ह्यात ७६ हजार लिटरने दूध संकलनात घट

सांगली जिल्ह्यात ७६ हजार लिटरने दूध संकलनात घट
सांगली जिल्ह्यात ७६ हजार लिटरने दूध संकलनात घट

सांगली ः जिल्ह्यातील ५२० गावांत पडलेला दुष्काळ, पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे संकट वाढते आहे. जिल्ह्याकडे दूध उत्पादकांचा पट्टा म्हणून पाहिले जाते. कडाक्‍याचा उन्हाळा, ओल्या चाऱ्याची कमतरता त्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. जिल्ह्यात प्रतिदिन सरासरी १५ लाख ते १६ लाख लिटर दूध संकलन होते. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात ७६ हजार १४१ लिटरने दूध संकलनात घट झाली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत सुमारे १ लाख लिटरहून अधिक घट होण्याची शक्यता संबंधित विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

जिल्ह्यात शेतीबरोबर पशुपालन हा मोठ्या प्रमाणावर केला जाणारा शेतकऱ्यांचा उद्योग आहे. शेतीचे पैसे वर्षाला येणारे असतात, मात्र जनावरांच्या पैशातून घर चालत असते. त्यामुळे ग्रामीण भागात जनावरांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात सहकारी १७, तर खासगी ७ दूध संघ आहेत. मात्र, दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगावात गेल्या चार महिन्यांपासून चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे.  

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून चारा मिळत नाही. प्रत्येक वर्षी पिकांसाठी उपयुक्त जरी पाऊस नाही पडला तरी थोडा थोडा तरी पाऊस पडतो. यामुळे थोडा थोडा तरी चारा उपलब्ध असतो. यंदा पावसाळ्यात पावसाने दडी दिली आणि परतीचा पाऊस झालाच नाही. पाणी नसल्याने माळावरची हिरवळही गायब झाली आहे. यामुळे जनावरांना चारायलाही वैरण नाही.

त्यातच उन्हाचा तडाखा, अशी दुहेरी परिस्थिती दुधाच्या घटीला कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे पशुधन झपाट्याने कमी होऊ लागले आहे. त्यामुळे चारा कुठून उपलब्ध करायचा असा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.  

जिल्ह्यातील दूध संकलनाचा दृष्टिक्षेप 
जानेवारी २०१९ 
सहकारी ४ लाख ३६ हजार ७९७ 
मल्टिस्टेट ३ लाख ४७ हजार ४२६
खासगी ७ लाख ४८ हजार ८८३
एकूण १५ लाख ३३ हजार १०६ 
फेब्रुवारी २०१९
खासगी ७,५४,९४८ लिटर
सहकारी ४,१३,९५६ लिटर
मल्टिस्टेट ३,६९,१०८ लिटर
एकूण १५,३८,०१२ लिटर
मार्च २०१९
खासगी ७,२३,९५२ लिटर
सहकारी ४,१९,११४ लिटर
मल्टिस्टेट ३,१८,८०६ लिटर
एकूण १४,६१,८७१ लिटर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com