सांगली जिल्ह्यात ५६ टक्के रब्बीची पेरणी

सांगली जिल्ह्यात ५६ टक्के रब्बीची पेरणी
सांगली जिल्ह्यात ५६ टक्के रब्बीची पेरणी

 सांगली : जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने त्याचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला आहे. रब्बी हंगामातील पेरणीचे सरासरी क्षेत्र २ लाख ५१ हजार ४९८ हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख ४३ हजार १४७ हेक्टरवर म्हणजे ५६ टक्के इतकी पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असून त्याच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता  आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाईमुळे यंदाचे रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्र कमी झाले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा रब्बीची अंदाजे ३० टक्क्यांनी पेरणी घटली असल्याचे चित्र आहे. सध्या ऊस गाळपाला जात असल्याने हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज आहे. रब्बी ज्वारीची १ लाख ४ हजार २१२ हेक्टर, गव्हाची १२ हजार २५७ हेक्टर, मक्याचे १० हजार २०२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

तेलवर्गीय पिकांमध्ये केवळ करडईची ३५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सूर्यफुलाची पेरणीच झाली नाही. आटपाडी तालुक्यात केवळ १९ टक्के, तर पलूस तालुक्यात ३० टक्के क्षेत्र रब्बीखाली आले आहे. सध्या पाणीटंचाई असल्याने पेरणी केलेल्या पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही. दुष्काळी पट्ट्यातील जत, आटपाडी, तालुक्यात पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. 

तालुकानिहाय रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

मिरज १९ ५१३
जत  ५९ ०३०
खानापूर  ६ ९४६
वाळवा १३ १३४
तासगाव ६ ६५७
शिराळा  ५ ०१९
आटपाडी   ४ ५४७
कवठेमहांकाळ १७ ९७०
पलूस  २ ७५९
कडेगाव ७ ५७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com