Agriculture news in marathi, In Sangli district, sowing rabi crops on 67 thousand hectares | Page 2 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७ हजार हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मॉन्सूनोत्तर पाऊस होता. त्यानंतर शेतात पाणी साचले असल्याने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी रखडली. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात पेरणीस सुरवात झाली आहे. आत्तापर्यंत ६७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वाधिक जत तालुक्यात, तर कमी पेरणी पलूस तालुक्यात झाली आहे.

सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मॉन्सूनोत्तर पाऊस होता. त्यानंतर शेतात पाणी साचले असल्याने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी रखडली. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात पेरणीस सुरवात झाली आहे. आत्तापर्यंत ६७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वाधिक जत तालुक्यात, तर कमी पेरणी पलूस तालुक्यात झाली आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात महापूर आला. त्यानंतर परतीचा पाऊस झाला. पुन्हा मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतात पाणी साचून राहिले. परिमाणी खरीप हंगामातील पिकाची काढणी रखडली. ती अंतिम टप्प्यात आहे. दुष्काळी पट्ट्यात मुरमाड जमिन असल्याने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यात पेरणी झाली आहे.

प्रामुख्याने या तालुक्यात मका, ज्वारी शेतकऱ्यांनी पेरली आहे. जिल्ह्याचे रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र २ लाख ५१ हजार ४९८ हेक्टर इतके असून, ६७ हजार ४३४ पेरा झाला आहे. वाळवा, पलूस, शिराळा, कडेगाव तालुक्यांत कसदार जमिनीमध्ये पाणी साचून राहिले होते. त्यामुळे अजूनही वाफसा आलेला नाही. पिकांच्या पेरणीसाठी अद्यापही मशागत झालेली नाही. या भागात अजूनही शेतात पिके उभी आहेत. त्यामुळे रब्बीतील पेरणीसाठी शेतीची मशागत कशी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे रब्बीतील पिकांच्या पेरणीसाठी विलंब होणार असल्याचे चित्र आहे. ही पेरणी शंभर टक्के पूर्ण होईल का, हा प्रश्न आहे. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद ‘केव्हीके’चे शेतकरी जोडो अभियानऔरंगाबाद : शेतकऱ्यांना जोडण्याच्या कामाला गती...
वऱ्हाडात यंदा पांढरे सोने ठरले...अकोला ः यंदाच्या खरिपात लागवड केलेले कपाशीचे पीक...
चक्रिवादळाचा थंडीवर परिणामकोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे...
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गिरणारे मजूर बाजारामुळे मिळाला...गिरणारे, जि. नाशिक : पेठ, त्र्यंबकेश्‍वरसह...
वीजबिलांचा विषय मंत्रिमंडळाने सोडलेला...मुंबई : जे अंगावर येतील त्यांच्या हात धुवून मागे...
नामपूर बाजार समिती संचालक मंडळाला...नाशिक : सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न...
आंदोलक शेतकरी दिल्लीत दाखलचंडीगड/ नवी दिल्ली  : केंद्राच्या कृषी...
महाराष्ट्राचा विकास हेच समान सूत्र : ...मुंबई ः ‘‘मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील...
मावा, तुडतुड्यांनी नुकसान केले पाच...भंडारा  : लाखनी तालुक्यात तुडतुडा, खोडकिडी,...
निर्यातवृद्धीसाठी पायाभूत सुविधा...रत्नागिरी  : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
भाताला प्रति क्विंटलला ७०० रुपये बोनस सिंधुदुर्ग : शासनाने भाताला प्रतिक्विंटलला...
लाळ्या खुरकूतच्या लसींची गरजसांगली :  जिल्ह्यात सुमारे १३ लाख १६...
साताऱ्यात अकरा लाख टन ऊसाचे गाळप सातारा : जिल्ह्यात ऊस गाळप हंगामास गती आली...
पदवीधरची निवडणूक प्रक्रिया सतर्कतेने...औरंगाबाद : ‘‘पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक...
केकत जळगावात बिबट्याची दहशतऔरंगाबाद : पैठण तालुक्यातील केकत जळगावात...
किनवटमध्ये किसान सभेचा रास्ता रोको नांदेड : कामगारांच्या राष्ट्रव्यापी संप तसेच...
खानदेशात ‘रब्बी’तील पीक कर्जवाटप सुरूजळगाव : खानदेशात खरिपातील पीक कर्ज वितरण ६०...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांच्या...नांदेड : जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी धडपड नाशिक : बियाण्यांची टंचाई, तसेच अतिवृष्टीमुळे...