सांगलीत शिल्लक ऊसाचा प्रश्‍न भेडसावणार

सांगली: जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अद्यापही तीन टक्के म्हणजे दीड ते दोन हजार एकर ऊस शेतामध्ये आहे. ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर ऊसतोड मजूरांना गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे शिल्लक ऊसाचा प्रश्‍न भेडसावणार आहे.
 Sangli district in sugarcane cutting headache
Sangli district in sugarcane cutting headache

सांगली : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अद्यापही तीन टक्के म्हणजे दीड ते दोन हजार एकर ऊस शेतामध्ये आहे. ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर ऊसतोड मजूरांना गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे शिल्लक ऊसाचा प्रश्‍न भेडसावणार आहे. 

जिल्ह्यातील दत्त इंडिया कंपनी, राजारामबापू कारखाना आणि हुतात्मा किसन अहीर हे साखर कारखाने सुरू आहेत. त्यातील दत्त इंडियाचा गळीत हंगाम सोमवारी (ता. ३०) बंद होणार आहे. ‘कोरोना’च्या भीतीने ऊसतोड मजूरांमध्ये देखील धास्ती आहे.  अनेकांना गावाकडे परतण्याचे वेध लागले आहेत. बरेच मजूर आठवड्यापूर्वीच परतले आहेत. कारखाना प्रशासनाने विनंती करून काही कामगारांना थांबवून ठेवले आहे. कसाबसा हंगाम संपवण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची भीती आहे. 

सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे एक लाख ८० हजार एकरवर ऊसाची लागण झालेली होती. यंदा दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पाऊस तसेच ‘एफआरपी’च्या वादातून ऊस गाळपास महिनाभर विलंब झाला. सांगली जिल्ह्यातील १६ पैकी १२ कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले. 

यंदा दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे ऊस क्षेत्र घटले आहे. त्यामुळे जेमतेम तीन ते चार महिने हंगाम चालेल असे चित्र होते. शेवटच्या टप्प्यात अधिकाधिक गाळपासाठी स्पर्धा रंगेल असे चित्र होते. परंतू ‘कोरोना’चे सावट आल्यामुळे हंगाम आटोपता घेण्यात आला.

मजुरांना जीवनावश्यक वस्तू देण्याचे निर्देश जिल्ह्यातील दत्त इंडिया, राजारामबापू आणि हुतात्मा हे तीन साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. मात्र, कोरोनामुळे ऊसतोड मजुरांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी पडणाऱ्या कडक उन्हाळ्यात मजुरांची घालमेल सुरू झाली आहे. ‘कोरोना’ मुळे जिल्ह्यात स्थलांतर करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. ऊसतोड मजुरांना जीवनावश्‍यक वस्तू आणि आवश्‍यक सुविधा देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कारखान्यांना निर्देश दिले आहेत. तरीही ऊसतोड मजूर गावाकडे जाण्यासाठी धडपडत आहे. दत्त इंडियाचा हंगाम सोमवारी (ता. ३०) संपणार आहे. तसेच आठवडाभरात राजारामबापू व हुतात्मा कारखान्यांचा हंगाम संपेल असे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com