सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा फळपीकविमा

सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा फळपीकविमा
सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा फळपीकविमा

सांगली ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेती विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना सन २०१८ मध्ये डाळिंब पिकाचा विमा हप्ता भरण्यासाठी १४ जुलैला मुदत संपली आहे. या मुदतीत जिल्ह्यातील १० हजार ६३१ शेतकऱ्यांनी ८९ कोटी ७७ लाख ८२ हजार रुपयांचा विमा उतरवला आहे. त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ८९ हजार रुपये हप्ता भरण्यात आल्याची माहिती जिल्हा बॅंक प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्हा बॅंकेला फळ पीकविमा योजनेंतर्गत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तालुक्‍यांतून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी योजनेत मोठा सहभाग नोंदवला. १३ जुलैपर्यंत केवळ २ हजार ६५४ शेतकऱ्यांनी १७.९२ कोटींचा विमा उतरवला होता. त्यासाठी १.३० कोटी रुपये विमा हप्ता जमा झाला. १४ जुलै रोजी सुटीच्या दिवशीही बॅंकेने सर्व शाखांचे व्यवहार सुरू ठेवले होते. त्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांची संख्या अडीच हजारावरून साडेदहा हजारावर गेली. विमा संरक्षित रक्कम एक कोटीवरून साडेचार कोटींवर गेली आहे.

जिल्हा बॅंकेने नेहमीच शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी जपल्यामुळे अन्य बॅंकांच्या तुलनेत योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणावर डाळिंब पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले. ७ हजार ४२० हेक्‍टरवरील फळपिकांना संरक्षण लाभले आहे. १३ जुलैपर्यंत केवळ पाच हजार ९८७ हेक्‍टरवरील फळांचाच विमा उतरवला होता. शेवटच्या दिवशी शाखा सुरू ठेवल्याने शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

तालुका सहभागी शेतकरी  विमा हप्ता विमा संरक्षण
जत ५०३५ २.०३ लाख ४०.७८कोटी
मिरज १९००० ८८,५११ १७.७० लाख
तासगाव १०१ ३.१३ लाख ६२.६४ लाख
पलूस २४२० रुपये ४८ हजार
क.महांकाळ १०९५ ३४.६६ लाख ६.९३ कोटी
कडेगाव ११ ४०,१११ ८.०२ लाख
खानापूर २७ ९०,८१० १८.१६ लाख
आटपाडी ४,३४२ २.०४ कोटी ४०.९८ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com