Agriculture news in marathi Sangli Ghatsarp, Farra pre-monsoon vaccination completed | Agrowon

सांगलीत घटसर्प, फऱ्याचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

कोरोनाच्या संकटामुळे जनावरांचे लसीकरण थांबले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. लाळ खुरकतचे लसीकरण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये करण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडून पत्र आले आहे. टॅगिंग केल्यानंतर लसीकरण करण्याचे निर्देश आले आहेत.
- डॉ. किरण पराग, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.

सांगली  ः कोरोना विषाणूमुळे गेल्या दोन महिन्यांपासून पशुधनांना लसीकरण देण्याचे काम थांबले होते. जून महिन्यात शासनाने नियम शिथिल केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंर्वधन विभागाने पशुधनांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषारचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण केले आहे आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील १३ लाख १७ हजार ८६६ जनावरांची संख्या आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद पशुवैद्यकीयचे १०३ दवाखाने असून पशुधन उपायुक्त कार्यालयाचेही दखावाने आहेत. गाई, म्हैशी व शेळ्या-मेंढ्या यांना घटसर्प, फऱ्या यांसह अन्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पशुधनाचे पशुवैद्यकीय शिबिर घेऊन लसीकरण केले जाते.

फेब्रुवारी महिन्यात लसीसह जनावरांना लागणाऱ्या लसी आणि औषधांची मागणी केली होती. ही औषधे पशुवैद्यकीय दवाखान्यात आली आहेत. मात्र, मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. परंतु, संचारबंदीतही पशुधनावर उपचार करता आले नाहीत. 

लाळ, खुरकत रोगांवरील पशुधनाचे प्रतिबंधक कवच एप्रिल-मे मध्ये संपले आहे. लाळ खुरकत ८ लाख २० हजार लसी मार्चमध्ये आल्या आहेत. मात्र, या लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत करण्यास सांगितले आहे. प्रथम टॅगिंग करून त्याची सर्व माहिती भरल्यानंतरच लसीकरण  होईल. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...