सांगलीत गूळ ३२०० ते ४३३० रुपये प्रतिक्विंटल

सांगलीत गूळ ३२०० ते ४३३० रुपये प्रतिक्विंटल
सांगलीत गूळ ३२०० ते ४३३० रुपये प्रतिक्विंटल

सांगली : येथील बाजार समितीच्या आवारात गुळाची ३०५६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३२०० ते ४३३०, तर सरासरी ३७६० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची १७९८ क्विंटल आवक झाली होती. कांद्यास प्रतिक्विंटल ८०० ते ५८००, तर सरासरी ३३०० रुपये असा दर होता. बटाट्याची ८३१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १७५०, तर सरासरी ११७५ रुपये असा दर मिळाला. आल्याची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५००० ते ७०००, तर सरासरी ६००० रुपये असा दर होता. बोरांची २४०५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १०० ते ६००, तर सरासरी ३५० रुपये असा दर मिळाला. डाळिंबांची १०४०० डझनाची आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस १५० ते  ३५०, तर सरासरी २५० रुपये असा दर होता. 

सीताफळांची ३७३० डझनाची आवक झाली. त्यांना प्रतिडझनास २५० ते ७५०, तर सरासरी ७०० रुपये असा दर मिळाला. सफरचंदांची ३६३० पेटीची आवक झाली. त्यांना प्रति पेटीस ४०० ते ९००, तर सरासरी ६५० रुपये असा दर मिळाला.

शिवाजी मंडईत वांग्यांची २०० बॉक्सची आवक झाली. त्यांना प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. कारल्याची १३० बॉक्स (१५ किलोचे एक बॉक्स) आवक झाली. त्यांना प्रति दहा किलोस १८० ते २०० रुपये असा भाव मिळाला. दोडक्याची १०० क्रेटची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची १०० पिशव्यांची आवक झाली. तिला प्रतिदहा किलोस १८० ते २०० रुपये असा दर होता. हिरव्या मिरचीची १४० पोत्यांची आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस १८० ते २०० रुपये असा दर मिळाला. शेवग्याची २० पोत्यांची आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस ५०० ते ६०० रुपये असा भाव होता.      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com