Sangli jaggery averages Rs. 3633 per quintal
Sangli jaggery averages Rs. 3633 per quintal

सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये प्रतिक्विंटल

येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७) गुळाची ३४८३ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ३१५० ते ४११५ तर सरासरी ३६३३ रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७) गुळाची ३४८३ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ३१५० ते ४११५ तर सरासरी ३६३३ रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीच्या आवारात सोयाबीनची १००० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ३८८० ते ४०५० तर सरासरी ३९६५ रुपये असा दर मिळाला. मटकीची २९० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ८५०० ते ९५०० तर सरासरी ९००० रुपये असा दर होता. ज्वारी (हायब्रीड)ची ११० क्विंटल आवक झाली होती.

ज्वारीला २६२० ते २९०० तर सरासरी २७६० रुपये असा दर मिळाला. ज्वारी (शाळू)ची ४६ क्विंटल आवक झाली होती. ज्वारीला २२०० ते ४२०० तर सरासरी ३५०० रुपये असा दर मिळाला. तांदळाची १०५ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ६५०० तर सरासरी ४३५० रुपये असा दर होता.

गव्हाची २१० क्विंटल आवक झाली होती. गव्हास प्रतिक्विंटल १९७५ ते २८५० तर सरासरी २४१३ रुपये असा दर मिळाला. वाटण्याची ३० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल १२००० ते १३००० तर सरासरी १२५०० रुपये असा दर होता.विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची ५६० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल १००० ते ५५०० तर सरासरी ३२०० रुपये असा दर मिळाला.

बटाट्याची ६९२ क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ३७०० तर सरासरी २८०० रुपये असा दर होता. लसूणाची १०० क्विंटल आवक झाली होती. लसणास प्रतिक्विंटल ५००० ते १०००० तर सरासरी ७५०० रुपये असा दर मिळाला. आल्याची ५ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल २००० ते ३५०० तर सरासरी २७०० रुपये असा दर होता. डाळिंबाची ३८ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल १००० ते ६००० तर सरासरी ३५०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com