सांगलीत गूळ ३३०० ते ४०५५ रुपये प्रतिक्विंटल
सांगलीत गूळ ३३०० ते ४०५५ रुपये प्रतिक्विंटल

सांगलीत गूळ ३३०० ते ४०५५ रुपये प्रतिक्विंटल

सांगली : येथील बाजार समितीच्या आवारात गुळाची आवक कमी अधिक प्रमाणात होत आहे. बुधवारी (ता. २३) गुळाची ३०७५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३०० ते ४०५५, तर सरासरी ३६७० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत मूगाची ३६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०५० ते ७२००, तर सरासरी ७१२५ रुपये असा दर मिळाला. मटकीची ४५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ५००० ते ९८००, तर सरासरी ७२५० रुपये असा दर होता. विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची ४२०५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते ४२०० रुपये असा दर होता. बटाट्याची ७१० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रति क्विंटल ८०० ते १७५० रुपये असा दर मिळाला. लसणाची ११० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५५० ते ४००० रुपये असा दर होता. 

शिवाजी मंडईत कोथिंबिरीची १० हजार पेड्यांची आवक झाली.  त्यांना प्रति शेकडा १५० ते २३० रुपये असा दर मिळाला. पालकाची १ हजार पेंड्यांची आवक झाली. त्यांना प्रति शेकडा १०० ते २५० रुपये असा दर होता. वांग्यांची ७० बॉक्सची आवक झाली. त्यांना प्रति दहा किलोस ४०० ते ७०० रुपये असा दर होता. दोडक्याची ६० बॉक्सची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला.

हिरव्या मिरचीची १०० पोत्यांची आवक झाली. तिला प्रति दहा किलोस १५० ते ३०० रुपये असा दर होता. ढोबळ्या मिरचीची १०० पिशव्यांची (एक पिशवी १० किलोची) आवक झाली. तिला प्रति दहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. गवारीची ५० पोत्याची (एक पोते ५० किलोची) आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस ५०० ते ८०० रुपये असा दर होता.

टोमॅटोची २०० क्रेट आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस  २५० ते २८० रुपये असा दर मिळाला. लिंबांची १५० पोत्यांची आवक झाली. लिंबांना प्रति पोत्यास  १००० ते १२०० रुपये असा दर होता. मेथीची २०० पेंड्यांची आवक झाली. त्यास प्रति शेकड्यास १८० ते २०० रुपये असा दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com