सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३५३० रुपये

सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३५३० रुपये
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३५३० रुपये

सांगली ः येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक प्रमाणात आहे. बुधवारी (ता. ३) गुळाची आवक ११६८ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २७०० ते ३५३० तर सरासरी ३११५ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

राजापुरी हळदीची आवक कमी झाली आहे. हळदीची आवक ११ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ५००० ते ७४७५, तर सरासरी ६२३८ रुपये असा दर मिळाला.

विष्णूअण्णा पाटील भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक ५४२५ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ३०० ते १२००, तर सरासरी ७०० रुपये असा दर होता. बटाट्याची आवक १३३८ क्‍विंटल झाली. बटाट्यास प्रतिक्विंटल १५०० ते १८००, तर सरासरी १६०० रुपये असा दर मिळाला. लसणाची १०० क्विंटल आवक झाली. लसणास प्रतिक्विंटल १००० ते २००० तर सरासरी १३०० रुपये असा दर होता. डाळिंबाची १८६२० डझनाची आवक झाली होती. डाळिंबास प्रतिदहा किलोस ५० ते २००, तर सरासरी १०० रुपये असा दर मिळाला. सीताफळाची ३१८० डझनांची आवक झाली, त्यास प्रतिडझनास ५० ते २०० रुपये, तर सरासरी १५० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com