Agriculture news in marathi Sangli Market Committee Deals Closed | Agrowon

सांगली बाजार समितीचे सौदे ३१ मार्चपर्यंत बंद

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 मार्च 2020

सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गर्दी होऊ न देण्याबाबत विश्रामबाग पोलिसांनी सूचना केली आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत कोणतेही सौदे न करण्याचा निर्णय घेतला आहे. हळद, गुळ व बेदाणा सौदे ठप्प झाल्यामुळे रोजची कोट्यवधी रूपयाची उलाढाल बंद झाली आहे. त्यामुळे गुरूवारी (ता.१९) मार्केट यार्ड परिसरात शुकशुकाट होता.  

सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गर्दी होऊ न देण्याबाबत विश्रामबाग पोलिसांनी सूचना केली आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत कोणतेही सौदे न करण्याचा निर्णय घेतला आहे. हळद, गुळ व बेदाणा सौदे ठप्प झाल्यामुळे रोजची कोट्यवधी रूपयाची उलाढाल बंद झाली आहे. त्यामुळे गुरूवारी (ता.१९) मार्केट यार्ड परिसरात शुकशुकाट होता.  

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने देखील या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. हा आदेश धुडकावून बाजार समिती आवारात व्यापारी व अडते यांच्या एका गटाने बुधवारी (ता.१८) बेदाणा सौदे घेण्याचा घाट घातला. त्यासाठी काही परप्रांतिय व्यापारी देखील उपस्थित होते. तर, कोरोना बाबत दक्षता हवी म्हणून व्यापाऱ्यांच्या एका गटाने सौदे घेण्यास मज्जाव केला. त्यावरून गोंधळ निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. अखेर बाजार समिती व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये ३१ मार्चपर्यंत सौदे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.  

सौदे घेण्यास मज्जाव केल्यामुळे सर्वत्र नेहमीप्रमाणे वर्दळ दिसून आली नाही. किराणा दुकाने आणि व्यापारी पेढ्यामध्ये दैनंदिन व्यवहार सुरू होते. सौदे नसल्यामुळे व्यापारी व अडते यांच्या दुकानासमोर माल पडून असल्याचे चित्र दिसले. काही गल्ल्यांमध्ये तर पूर्ण शुकशुकाट जाणवला. हमालांच्या अड्ड्यावर काहीजण विश्रांती घेत असल्याचे चित्र दिसले. व्यापारी दुकानातील हमाल, कर्मचारी यांची हालचाल तेवढी जाणवली.  

परप्रांतीय व्यापाऱ्यांचा मुक्काम 

बेदाणा सौद्यांसाठी परप्रांतीय व्यापारी काही दिवस मुक्काम ठोकून होते. परंतू, आता ३१ मार्चपर्यंत सौदे बंद राहणार असल्यामुळे त्यांना मुक्काम स्थगित करावा लागणार आहे.  

सहकार्य करण्याचे आवाहन 

सौदे बंद राहणार असल्यामुळे रोजची २० कोटीहून अधिक उलाढाल ठप्प राहील. आर्थिक मंदीमुळे व्यापार पेठ यापूर्वीच अडचणीत असताना आता ‘कोरोना' मुळे पुन्हा सौदे बंद राहतील. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले.  


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...