सांगली बाजार समितीतील सौदे राहणार चार दिवस बंद

सांगलीः जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती, चेंबर ऑफ कॉमर्स आणि खरेदीदार अडते यांनी संयुक्त बैठक घेतली. त्यात चार दिवस सौदे आणि तीन दिवस धान्य विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Sangli Market Committee Deals will remain closed for four days
Sangli Market Committee Deals will remain closed for four days

सांगली ः जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती, चेंबर ऑफ कॉमर्स आणि खरेदीदार अडते यांनी संयुक्त बैठक घेतली. त्यात चार दिवस सौदे आणि तीन दिवस धान्य विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवार (ता. ८ ) ते शनिवार (ता. ११)  जुलैअखेर गूळ, हळद व बेदाणा सौदे बंद राहतील. तर, गुरुवार (ता. ९)  ते  शनिवार (ता. ११) जुलैअखेर धान्य विभाग बंद राहील, अशी माहिती बाजार समिती सभापती दिनकर पाटील व चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी दिली. 

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जवळपास अडीच महिने सौदे बंद राहिले. तर, धान्य विभाग देखील ठराविक वेळेत सुरू ठेवण्यात आला. लॉकडाउनमध्ये शिथीलता आणल्यानंतर बेदाणा आणि हळद सौदे ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हळद व बेदाणा सौदे खुल्या पद्धतीने होऊ लागले. तसेच धान्य विभाग देखील सुरू आहे.

बाजार समितीतील जिल्ह्यातील ग्रामीण भागातून तसेच इतर जिल्ह्यातील शेतकरी, खरेदीदार शेतीमाल विक्री आणि खरेदीसाठी येतात. सध्या कोरोनाचे रूग्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि शहरी भागात वाढू लागले आहेत. ५०० हून अधिक रूग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे सर्वांना धास्ती वाटू लागली आहे. त्यामुळे सौदे बंद ठेवण्याचा निर्णय झाला.  दरम्यान या काळात बाजार समितीचे कार्यालयीन कामकाज सुरू राहणार असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com