Agriculture news in Marathi, sangli market in jaggery per quintal 2800 to 3000 rupees | Agrowon

सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २८०० ते ३००० रुपये

टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जुलै 2019

सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. ३०) गुळाची १११८ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ३००० तर सरासरी ३१५० रुपये असा दर मिळाला. हळदीचे सौदे आठवड्यातून दोन वेळा होत आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. ३०) गुळाची १११८ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ३००० तर सरासरी ३१५० रुपये असा दर मिळाला. हळदीचे सौदे आठवड्यातून दोन वेळा होत आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीच्या आवारात तांदळाची २४० क्विंटल आवक झाली होती. तांदळास प्रतिक्विंटल २२०० ते ६००० तर सरासरी ४१०० रुपये असा दर मिळाला. बाजरीची १३० क्विंटल आवक झाली होती. बाजरीस प्रतिक्विंटल २४०० ते २५०० तर सरासरी २४१० रुपये असा दर मिळाला. ज्वारी (हायब्रिड)ची २२० क्विंटलची आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २४३० ते २८०० तर सरासरी २६१५ असा दर होता. ज्वारी (शाळू)ची ३५० क्विंटलची आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० तर सरासरी ३७५० असा दर होता.

विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची ७८५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ५५० ते १६५० तर सरासरी ११०० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची १६० क्विंटलची आवक झाली होती. बटाट्यास प्रतिक्विंटल ७०० ते ११०० तर सरासरी ९०० रुपये असा दर होता. डाळिंबाची आवक वाढली असून, ४०८० किलोची आवक झाली होती. डाळिंबास प्रति दहा किलोस ५०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. लसणाची १९५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ६००० तर सरासरी ४७५० रुपये असा दर मिळाला. अननसाची १७२ डझन आवक झाली होती. प्रतिडझनास २०० ते ६०० रुपये असा दर होता. सफरचंदाची ४५५ पेट्यांची आवक झाली असून, त्यास प्रतिपेटीस १००० ते ३००० रुपये असा दर मिळाला.

शिवाजी मंडईत वांग्याची २०० ते २५० क्रेटची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. मिरचीची ५०० ते ६०० पिशवीची आवक झाली होती. मिरचीस प्रति दहा किलोस ३०० ते ३५० रुपये असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची ५०० पिशवीची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर होता.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात कांदा, लसूण, बटाट्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत कांदा १००० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात द्राक्ष प्रतिक्विंटल १५०० ते...परभणीत ५४०० ते ७००० रुपये परभणी येथील पाथरी...
जळगावात आले २४०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५...
सांगलीत गूळ ३२०० ते ४०४५ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १४...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबांचे दर पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नागपूरला सोयाबीन दरात सुधारण्याचा अंदाजनागपूर : बाजारात उशिरा येणाऱ्या सोयाबीनची प्रत...
पुण्यात भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट;...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये अंजीर ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वाटाण्याला २००० ते ३००० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
खानदेशात लाल कांद्याची आवक वाढलीजळगाव : खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात डाळिंब प्रतिक्विंटल १५० ते ६०००...नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सांगलीत बटाट्यास १५०० ते २२०० रुपये सांगली : विष्णूअण्णा पाटील दुय्यम बाजार आवारात...
जळगावात भरताची वांगी १६०० ते २००० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १...
नगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा कायम नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ...
नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट; दरात वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
नगर जिल्ह्यात कांदा साडेपाच हजारांवर...नगर ः गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले कांद्याचे...
पुण्यात बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कापूस दर ५१०० रुपये...जळगाव  ः शासकीय खरेदी बऱ्यापैकी सुरू...