सांगली महापालिका क्षेत्रात अठरा ठिकाणी भाजी विक्री सुरू
सांगली महापालिका क्षेत्रात अठरा ठिकाणी भाजी विक्री सुरू

सांगली महापालिका क्षेत्रात अठरा ठिकाणी भाजी विक्री सुरू

आम्हाला जागा नेमून दिल्या आहेत. त्याच ठिकाणी विक्री करतोय. भाजी अपुरी पडणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीच्या वेळी गर्दी करू नये. आम्ही आमची काळजी घेऊन भाजीची विक्री करत आहे. - दिलावर बागवान, व्यापारी, सांगली

सांगली : ‘कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रातील आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. सांगलीत शिवाजी मंडई आणि जुनी भाजी मंडई येथे ग्राहकांची गर्दी होऊ लागल्याने गर्दी टाळण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस बुधवार (ता.२५) पासून यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात १८ ठिकाणी भाजीपालाविक्री केंद्रे निश्‍चित केली आहेत. सकाळी ७ ते ११ पर्यंत भाजीपाला उपलब्ध होईल. ‘कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनानुसार भाजीपाला विक्रेते संघटनेने सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरातील आठवडा बाजार बंद केले आहेत. परंतु भाजीपाला हा नाशवंत आणि जीवनावश्‍यक असल्यामुळे सांगलीत शिवाजी मंडई आणि पेठभागातील जुनी भाजी मंडई ही दोन ठिकाणे निश्‍चित केली होती. परंतु काल आणि आज तेथे ग्राहकांनी गर्दी केली. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला विक्रीची अडचण लक्षात घेऊन आयुक्त नितीन कापडणीस यांनी भाजीपाला विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तिन्ही शहरातील १८ ठिकाणे निश्‍चित केली.  सांगली जिल्ह्यातील जवळच्या भागातून सकाळी पहाटे पाचच्या सुमारास शहरात भाजीपाला येत आहे. बुधवारी विटा, आष्टा, वाळवा यासह अन्य भागातून शेतकरी गाडीतून भाजी सौद्यासाठी येत आहे. अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.  येथे मिळेल भाजीपाला-

  • सांगली विभाग- पेठभाग भाजी मंडई, शिवाजी मंडई, सांगलीवाडी चिंचबाग, एसटी ऑफीससमोर कोल्हापूर रस्ता, महावीर उद्यान (बापट मळा), माधवनगर जकात नाका, बायपास रस्ता पेट्रोलपंप, एसएफसी मॉल पार्किंग परिसर, स्फूर्ती चौक विश्रामबाग, खिलारे मंगल कार्यालयासमोर शामरावनगर.
  • मिरज विभाग- लक्ष्मी मार्केट, गाडवे चौक, शास्त्री चौक/फुले चौक, न्यू इंग्लिश स्कुलसमोर, डॉ. आंबेडकर उद्यान.
  • कुपवाड विभाग- कापसे प्लॉट, मंगळवार बाजार कॉर्नर, अभयनगर स्टेट बँक कॉलनी, बर्वे शाळेजवळ, रोहिदासनगर पाण्याच्या टाकीजवळील क्रीडांगण.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com