agriculture news in marathi Sangli muncipal corporation to start vegetable selling centers | Page 2 ||| Agrowon

सांगली महापालिका क्षेत्रात अठरा ठिकाणी भाजी विक्री सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 मार्च 2020

आम्हाला जागा नेमून दिल्या आहेत. त्याच ठिकाणी विक्री करतोय. भाजी अपुरी पडणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीच्या वेळी गर्दी करू नये. आम्ही आमची काळजी घेऊन भाजीची विक्री करत आहे.
- दिलावर बागवान, व्यापारी, सांगली
 

सांगली : ‘कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रातील आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. सांगलीत शिवाजी मंडई आणि जुनी भाजी मंडई येथे ग्राहकांची गर्दी होऊ लागल्याने गर्दी टाळण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस बुधवार (ता.२५) पासून यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात १८ ठिकाणी भाजीपालाविक्री केंद्रे निश्‍चित केली आहेत. सकाळी ७ ते ११ पर्यंत भाजीपाला उपलब्ध होईल.

‘कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनानुसार भाजीपाला विक्रेते संघटनेने सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरातील आठवडा बाजार बंद केले आहेत. परंतु भाजीपाला हा नाशवंत आणि जीवनावश्‍यक असल्यामुळे सांगलीत शिवाजी मंडई आणि पेठभागातील जुनी भाजी मंडई ही दोन ठिकाणे निश्‍चित केली होती. परंतु काल आणि आज तेथे ग्राहकांनी गर्दी केली. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला विक्रीची अडचण लक्षात घेऊन आयुक्त नितीन कापडणीस यांनी भाजीपाला विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तिन्ही शहरातील १८ ठिकाणे निश्‍चित केली. 

सांगली जिल्ह्यातील जवळच्या भागातून सकाळी पहाटे पाचच्या सुमारास शहरात भाजीपाला येत आहे. बुधवारी विटा, आष्टा, वाळवा यासह अन्य भागातून शेतकरी गाडीतून भाजी सौद्यासाठी येत आहे. अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

येथे मिळेल भाजीपाला-

  • सांगली विभाग- पेठभाग भाजी मंडई, शिवाजी मंडई, सांगलीवाडी चिंचबाग, एसटी ऑफीससमोर कोल्हापूर रस्ता, महावीर उद्यान (बापट मळा), माधवनगर जकात नाका, बायपास रस्ता पेट्रोलपंप, एसएफसी मॉल पार्किंग परिसर, स्फूर्ती चौक विश्रामबाग, खिलारे मंगल कार्यालयासमोर शामरावनगर.
  • मिरज विभाग- लक्ष्मी मार्केट, गाडवे चौक, शास्त्री चौक/फुले चौक, न्यू इंग्लिश स्कुलसमोर, डॉ. आंबेडकर उद्यान.
  • कुपवाड विभाग- कापसे प्लॉट, मंगळवार बाजार कॉर्नर, अभयनगर स्टेट बँक कॉलनी, बर्वे शाळेजवळ, रोहिदासनगर पाण्याच्या टाकीजवळील क्रीडांगण.

 


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...