सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९० क्विंटल बियाणे

यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. हंगामासाठी बियाणांची ३३ हजार ६९० क्विंटल, तर खतांसाठी १ लाख ४२ हजार टनांची मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९० क्विंटल बियाणे Sangli is needed for kharif 33 thousand 690 quintals of seeds
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९० क्विंटल बियाणे Sangli is needed for kharif 33 thousand 690 quintals of seeds

सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. हंगामासाठी बियाणांची ३३ हजार ६९० क्विंटल, तर खतांसाठी १ लाख ४२ हजार टनांची मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. यंदा खते व बियाणांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.

जिल्ह्यात यंदा हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार १०३ टक्‍के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हंगामातील पाऊसही वेळेवर सुरू होण्याची शक्‍यता आहे. उन्हाळी मशागतींसाठी चार दिवसांत पावसाची शक्‍यता आहे. शेतकरी आतापासूनच मशागतींच्या तयारीला लागले आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७७ हजार ३१३ हेक्‍टर आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा होतो. यंदा मात्र कृषी विभागाने सोयाबीन बियाणे घरचेच वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याला कितपत प्रतिसाद मिळतोय. हे पाहणे महत्त्वाचे आहे. शिराळा तालुक्‍यात भात पिकाचे क्षेत्र अधिक असते. यंदा पाऊस चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

 त्यानुसार शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे.यंदा चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे खरिपाचे क्षेत्र वाढणार असले, तरी सोयाबीन बियाणे घरचे वापरण्यास सांगितल्यामुळे मागणी घटली. गेल्या वर्षी कृषी विभागाने ५२ हजार ८५३ क्विंटल बियाणांची मागणी केली. यंदा मोठी घट झाली. ३३ हजार ६९० क्विंटल बियाणांची मागणी नोंदवली गेली आहे. खरिपासाठी मागणी केलेल्या बियाण्यांत संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सुधारित बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, वाटाणा, तागाच्या बियाण्यांचा समावेश आहे. पेरणीसाठी खते, बियाणांची अडचण भासू नये, म्हणून कृषी विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया जिल्ह्यात खरिपाचे नियोजन सुरू आहे. बियाणे, खतांची मागणी केली आहे. त्यांचा तुटवडा भासणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. 

-बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

बियाणे मागणी (क्विंटलमध्ये)    

  • भात    ६५३८
  • ज्वारी     ६९८७
  • बाजरी     २५२२
  • तूर    ३६३
  • मूग     ४०३
  • उडीद     ५६५
  • भुईमूग     १०१९
  • सोयाबीन     ९७२४
  • सूर्यफूल     १२९
  • मका     ६२९०
  • कापूस     ५०  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com