सांगलीत १४३ गावांत कारभाऱ्यांसाठी चुरशीने मतदान 

जिल्ह्यातील १४३ गावांतील कारभारी ठरवण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान अतिशय चुरशीने झाले.चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अपवाद वगळता मतदान शांततेत झाले.
सांगलीत १४३ गावांत कारभाऱ्यांसाठी चुरशीने मतदान In Sangli, polling was held in 143 villages
सांगलीत १४३ गावांत कारभाऱ्यांसाठी चुरशीने मतदान In Sangli, polling was held in 143 villages

सांगली : जिल्ह्यातील १४३ गावांतील कारभारी ठरवण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान अतिशय चुरशीने झाले. गावा-गावांत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अपवाद वगळता मतदान शांततेत झाले.  महाविकास आघाडी विरोधात भाजप समर्थकांमध्ये लढत झाली. काही गावात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार झाले. सकाळी साडेएकरापर्यंत ३० टक्के, दुपारी दीड वाजता ५० टक्के मतदान झाले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ६० टक्केवर मतदान झाल्याचे सांगण्यात आले.  सकाळी साडेसात वाजता मतदान सुरु होण्यापूर्वीच काही मतदान केंद्रावर गर्दी झालेली होती. वाड्या-वस्त्यांसह मतदान केंद्रापासून दूर रहिवासी असलेल्या मतदारांना ने-आण करण्यासाठी सरसकट उमेदवार व पॅनेलकडून तीन चाकींसह चार चाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. सर्वच मतदान केंद्रावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संवेदनशील केंद्रावर राज्य राखीव दलाचे जवानही तैनात ठेवले होते. सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या. त्यातही विशेष झोपडपट्टी, वस्त्या आणि मागासवर्गीय वसाहतीमधील मतदार लवकर बाहेर काढून एक गठ्ठा मतदान कसे मिळवता येईल, यासाठी उमेदवारांनी प्रयत्न केले. दुपारी तीन वाजल्यानंतर मतदान कोन करायचे राहिले आहे याचा शोध घेऊन त्यांना मतदानासाठी आणले जात होता. परगावच्या मतदारांसाठी विशेष मोहीमच उमेदवारांनी राबवली होती.  नऊ ग्रामपंचायती बिनविरोध 

एप्रिल ते डिसेंबर २०२० कालावधीत मुदत संपलेल्या १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी ९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ५५१ प्रभागातील १ हजार ५०८ जागांसाठी २ हजार ८८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ग्रामपंचायतींसाठी १ लाख ६८ हजार २२६ स्त्री तर १ लाख ७३ हजार ३७३ पुरुष, इतर ११ असे एकूण ३ लाख ४३ हजार ८१२ मतदार आहेत.  असे झाले मतदान  ० सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर गर्दी  ० मतदारांना केंद्रापर्यंत वाहनाची सोय  ० कार्यकर्त्यांची मतदारांना आणण्यासाठी पळापळ  ० काही गावात किरकोळ वादावादीचे प्रकार  ० परगावातील मतदार आणण्यासाठी पळापळ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com