Agriculture news in marathi Sangli pre-monsoon rains Crop damage over 1500 hectares | Agrowon

सांगलीत पूर्वमोसमी पावसाने  १५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

मंगळवार, 4 मे 2021

सांगली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या पूर्वमोसमी पावसाचा फटका पिकांना बसला आहे. सुमारे १ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्याचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे.

सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या पूर्वमोसमी पावसाचा फटका पिकांना बसला आहे. सुमारे १ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्याचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. मिरज, पलूस, आटपाडी, वाळवा तालुक्यांत सर्वाधिक पिके पावसाने बाधित झाली आहेत. पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट झाली. मिरज, तासगाव, पलूस, शिराळा, आटपाडी, वाळवा आणि कडेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ऊस, केळी, डाळिंब पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. वाऱ्याने केळी आणि ऊस पिके भुईसपाट झाली. वाळवा तालुक्यातील पॉलीहाउसचे मोठे नुकसान झाले. 

वाळवा, मिरज, पलूस आणि आटपाडी या चार तालुक्यांत सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये भाजीपाला, ऊस, डाळिंब आणि द्राक्ष पिके आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने कृषी विभागाने जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानुसार १ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. पिकांचा अहवाल कृषी विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. परंतु, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी अद्यापही कृषी विभागाने हालचाली सुरू केल्या नसल्याचे चित्र आहे. कृषी विभागाने लवकरात लवकर पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 

प्रतिक्रिया
जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसामुळे १ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा अहवाल तयार केला आहे. पिकाच्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे. 
बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी 

टॅग्स

इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...