सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली-तासगाव येथील बाजार समितीत बेदाण्याचे सौदे बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला असल्याने पंधरा दिवस बेदाण्याचे सौदे निघणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Sangli raisin deals closed for fortnight
Sangli raisin deals closed for fortnight

सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली-तासगाव येथील बाजार समितीत बेदाण्याचे सौदे बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला असल्याने पंधरा दिवस बेदाण्याचे सौदे निघणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

सांगली जिल्ह्यातील सांगली आणि तासगाव या दोन्ही बाजार समित्यात बेदाण्याचे सौदे होतात. परंतु व्यापारी असोसिएशनने बुधवारीच वाढत्या कोरोनामुळे बेदाण्याचे सौदे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शुक्रवार (ता. ३०) पर्यंत बेदाण्याचे सौदे होणार नसल्यावर शिक्का मोर्तब झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सांगलीत बेदाणा सौदे सुरू ठेवायचे काय याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली होती. परंतु ही बैठक अद्यापही झालेली नाही. परिणामी, त्याबाबात निर्णय झाला नाही. 

दरम्यान, तासगाव बाजार प्रशासन, शीतगृह मालक यांची तहसील कार्यालयात गुरुवारी (ता. १५) याबाबत बैठक झाली. त्यामध्ये शीतगृहात शेतकऱ्यांचा माल ठेवून घ्यावा. शीतगृहामध्ये सौदे करू नये. सौदे केले तर शीतगृह मालकास दंड केला जाईल. दुसऱ्यावेळी सौदे करताना आढलले, तर शीतगृह सील करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली-तासगाव व्यापारी असोसिएशनने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील बाजार समितीत बेदाणे सौदे सुरूच असल्यची माहिती या बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

पंढरपुरात सौदे सुरू  पंढरपूर (जि. सोलापूर) येथील बाजार समितीच्या सचिवांशी संपर्क केला असता ते म्हणाले, की आमच्या बाजार समितीतील व्यापारी असोसिएशनने बेदाण्याचे सौदे बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आमच्याकडे बेदाण्याचे सौदे सुरू आहेत. त्यामुळे एका बाजूला सांगली आणि तासगाव बाजार समितीत सौदे बंद ठेवण्याच्या निर्णय तर दुसरीकडे पंढरपूर बाजार समितीत व्यापारी असोशिएशनने सौदे सुरू ठेवण्याचा निर्णय यामुळे शेतकऱ्यांमध्ये सभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

बाजार समिती आणि शीतगृह मालक यांची तहसील कार्यालयात सौद्याबाबत बैठक झाली. त्यामध्ये वाढत्या कोराना प्रादुर्भाने सौदे बंद ठेवण्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांचा शीतगृहात ठेवावा, अशा देखील सूचना शीतगृह मालकांना दिल्या आहेत.  - चंद्रकांत सूर्यवंशी,  सचिव, तासगाव बाजार समिती तासगाव 

बेदाणा तयार झाला की शेतकरी तो लगेच विकतात. परंतु सौदे बंद असल्याने हा बेदाणा विक्री करता येत नाही. त्यामुळे त्यांना शीतगृहात ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दरम्यान, पंढरपूरमध्ये सौदे सुरू आहेत. मग सांगली आणि तासगावात बंदचा निर्णय का घेतला आहे. त्यामुळे याचा फटका आम्हाला बसतोय.  - प्रशांत जाधव, बेदाणा उत्पादक शेतकरी, गव्हाण, ता. तासगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com