Agriculture news in marathi Sangli raisin deals closed for fortnight | Page 2 ||| Agrowon

सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली-तासगाव येथील बाजार समितीत बेदाण्याचे सौदे बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला असल्याने पंधरा दिवस बेदाण्याचे सौदे निघणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली-तासगाव येथील बाजार समितीत बेदाण्याचे सौदे बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला असल्याने पंधरा दिवस बेदाण्याचे सौदे निघणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

सांगली जिल्ह्यातील सांगली आणि तासगाव या दोन्ही बाजार समित्यात बेदाण्याचे सौदे होतात. परंतु व्यापारी असोसिएशनने बुधवारीच वाढत्या कोरोनामुळे बेदाण्याचे सौदे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शुक्रवार (ता. ३०) पर्यंत बेदाण्याचे सौदे होणार नसल्यावर शिक्का मोर्तब झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सांगलीत बेदाणा सौदे सुरू ठेवायचे काय याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली होती. परंतु ही बैठक अद्यापही झालेली नाही. परिणामी, त्याबाबात निर्णय झाला नाही. 

दरम्यान, तासगाव बाजार प्रशासन, शीतगृह मालक यांची तहसील कार्यालयात गुरुवारी (ता. १५) याबाबत बैठक झाली. त्यामध्ये शीतगृहात शेतकऱ्यांचा माल ठेवून घ्यावा. शीतगृहामध्ये सौदे करू नये. सौदे केले तर शीतगृह मालकास दंड केला जाईल. दुसऱ्यावेळी सौदे करताना आढलले, तर शीतगृह सील करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली-तासगाव व्यापारी असोसिएशनने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील बाजार समितीत बेदाणे सौदे सुरूच असल्यची माहिती या बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

पंढरपुरात सौदे सुरू 
पंढरपूर (जि. सोलापूर) येथील बाजार समितीच्या सचिवांशी संपर्क केला असता ते म्हणाले, की आमच्या बाजार समितीतील व्यापारी असोसिएशनने बेदाण्याचे सौदे बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आमच्याकडे बेदाण्याचे सौदे सुरू आहेत. त्यामुळे एका बाजूला सांगली आणि तासगाव बाजार समितीत सौदे बंद ठेवण्याच्या निर्णय तर दुसरीकडे पंढरपूर बाजार समितीत व्यापारी असोशिएशनने सौदे सुरू ठेवण्याचा निर्णय यामुळे शेतकऱ्यांमध्ये सभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

बाजार समिती आणि शीतगृह मालक यांची तहसील कार्यालयात सौद्याबाबत बैठक झाली. त्यामध्ये वाढत्या कोराना प्रादुर्भाने सौदे बंद ठेवण्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांचा शीतगृहात ठेवावा, अशा देखील सूचना शीतगृह मालकांना दिल्या आहेत. 
- चंद्रकांत सूर्यवंशी, 
सचिव, तासगाव बाजार समिती तासगाव 

बेदाणा तयार झाला की शेतकरी तो लगेच विकतात. परंतु सौदे बंद असल्याने हा बेदाणा विक्री करता येत नाही. त्यामुळे त्यांना शीतगृहात ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दरम्यान, पंढरपूरमध्ये सौदे सुरू आहेत. मग सांगली आणि तासगावात बंदचा निर्णय का घेतला आहे. त्यामुळे याचा फटका आम्हाला बसतोय. 
- प्रशांत जाधव, बेदाणा उत्पादक शेतकरी, गव्हाण, ता. तासगाव


इतर अॅग्रो विशेष
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...
राज्यातील पाणीसाठा ४४ टक्क्यांवर पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला...