सांगलीत राजापुरी हळद प्रतिक्विंटल ७१०० रुपये

सांगलीत राजापुरी हळद प्रतिक्विंटल ७१०० रुपये
सांगलीत राजापुरी हळद प्रतिक्विंटल ७१०० रुपये

सांगली ः येथील बाजार समितीच्या आवारात हळदीची आवक कमी अधिक होऊ लागली आहे. मंगळवारी (ता. २८) राजापुरी हळदीची २६४१ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ५५०० ते ८७०० तर सरासरी ७१०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीच्या आवारात गुळाची २३५१ क्विंटल आवक झाली. गुळास प्रतिक्विंटल २८०० ते ३६२५ तर सरासरी ३२१३ रुपये असा दर होता. परपेठ हळदीची २७२२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ४००० ते ७००० तर सरासरी ५५०० रुपये असा दर होता. लाल मिरचीची ९२ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ८००० ते ९००० तर सरासरी ८५०० रुपये असा दर मिळाला.

विष्णू अण्णा पाटील भाजी पाला व फळे दुय्यम बाजार आवारात कांद्याची ८४४५ क्विंटल आवक झाली. कांद्यास प्रतिक्वंटल २०० ते १३०० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची ४८१ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ५५० ते १४०० रुपये असा दर होता. कलिंगडाची ३०८३१ डझनाची आवक झाली असून त्यास प्रतिडझनास २५० ते ४५० रुपये असा दर मिळाला. आंबा १३९९ पेटी आवक झाली. आंब्याच्या प्रतिपेटीस ८०० ते १५०० रुपये असा दर होता. आंब्याची ५८७१ बॉक्सची आवक झाली होती. आंब्याच्या प्रतिबॉक्सला १०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. 

शिवाजी मंडईत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दर वधारले आहेत. वांग्याची ४०० ते ५०० पिशव्यांची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १०० ते ४०० रुपये असा दर होता. ढोबळी मिरचीची ४०० पिशव्यांची आवक झाली. ढोबळी मिरचीस प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर होता. गवारची २०० ते २५० किलोची आवक झाली होती. गवारीस प्रतिदहा किलोस ६०० ते ७०० रुपये असा दर मिळाला.

मंगळवारी आलेला शेतीमाल (आवक क्विंटलमध्ये व दर रुपयांत)
शेतीमाल आवक किमान कमाल सरासरी
हरभरा ३० ४४०० ४६०० ४५००
मटकी ८८ ५५०० १०५०० ८०००
ज्वारी (हायब्रीड) ६१ २४३० २४५० २४४०
ज्वारी (शाळू) २०८ २५०० ४५०० ३५००
बाजरी ५० २२०० २४०० २३००
तांदूळ ६०९ २३०० ६००० ४१५०
वाटाणा ४३ ७००० ७२०० ७१००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com