agriculture news in marathi In Sangli soybean production will decline by 10 to 15 per cent | Page 3 ||| Agrowon

सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे उत्पादन घटणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021

सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात सुमारे ४८५ हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले असून सोयाबीनच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या महापुराने पाच तालुक्यांतील सोयाबीनला फटका बसला होता. सुमारे ४८५ हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले असून सोयाबीनच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४७ हजार १०१ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ५१ हजार ७५५ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. सध्या जिल्ह्यात सोयाबीन पिकाची काढणी सुरू आहे.वास्तविक पाहता, सोयाबीन पीक हे वाळवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यानंतर मिरज, तासगाव, शिराळा आणि पलूस तालुक्यात देखील सरासरी ५ हजार हेक्टरपेक्षा जास्त पेरणी आहे. सोयाबीनला अपेक्षित दर मिळाला नसल्याने गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाली होती. परंतु उत्पादन कमी असल्याने सोयाबीनला यंदा चांगला दर मिळाला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याचे चित्र आहे.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात महापूर आला होता. या महापुराचा फटका मिरज, वाळवा, शिराळा, पलूस आणि तासगाव तालुक्याला बसला. या पाच तालुक्यातील ४८५ हेक्टरवरील सोयाबीन पिकाला महापुराचा फटका बसला. अनेक भागातील शेतकऱ्यांचे शंभर टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे. महापुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया...
सध्या जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. परंतु महापुराने सोयाबीनला फटका बसला आहे. त्यामुळे १० टक्के उत्पादन घट होईल, अशी शक्यता आहे. सोयाबीनवर करपा आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पण या रोगाचा उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही.
- डॉ. मिलिंद देशमुख, सोयाबीन पैदासकार,
षी संशोधन केंद्र कसबेडिग्रज, जि. सांगली


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी...
परभणी जिल्ह्यात खतांची मागणी वाढलीपरभणी ः परभणी जिल्ह्यात शनिवार (ता.६) अखेर पर्यंत...
पुणे जिल्ह्यात ढगांमुळे शेतकरी धास्तावलेपुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका...