Agriculture news in marathi Sangli sugar production 13 lakh quintals | Page 3 ||| Agrowon

सांगलीत साखरेचे उत्पादन १३ लाख क्विंटलने वाढले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची अखेर सांगता झाली आहे. १५ साखर कारखान्यांनी ८० लाख टन उसाचे गाळप करून ९५.०८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन यंदा घेतले. जिल्ह्याचा सरासरी उतारा ११.८६ टक्के इतका आहे.

सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची अखेर सांगता झाली आहे. १५ साखर कारखान्यांनी ८० लाख टन उसाचे गाळप करून ९५.०८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन यंदा घेतले. जिल्ह्याचा सरासरी उतारा ११.८६ टक्के इतका आहे. गतवर्षी दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टी या तीन संकटाचा फटका बसला होता. त्यामुळे ८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा साखरेचे उत्पादन १३ लाख क्विंटलने साखरेचे उत्पादन वाढले आहे. 

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रारंभ झाला. काही कारखाने पहिल्या पंधरवड्यात तर काही कारखाने दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या मध्यावर सुरू झाले. काही कारखाने साडेतीन महिने तर काही साडेचार महिन्यापर्यंत चालले. यंदाच्या हंगामात खासगी व सहकारी, असे १५ कारखाने सुरू राहिले. त्यापैकी तासगाव, जत आणि यशवंत हे तीन बंद पडलेले कारखाने यंदा सुरू झाले आहेत. तर महांकाली, माणगंगा आणि केन ॲग्रो हे कारखाने यंदा बंदच राहिले. हंगाम यंदा महिनाभर उशिराने सुरू झाला.

सुरुवातीच्या काळात मजुरांची टंचाई काही ठिकाणी भेडसावली. तसेच ऊसतोडीसाठी पैसे मागण्याचे प्रकार घडले. या बाबत तक्रारी झाल्यानंतर थोडाफार आळा बसला. यंदा ऊसक्षेत्र मुबलक असल्यामुळे एक कोटी क्विंटलपर्यंत साखर उत्पादन होईल, अशी शक्‍यता होती. परंतु प्रत्यक्षात ९५ लाख क्विंटलपर्यंतच साखर उत्पादन झाले. गतवर्षी दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टी या तीन संकटाचा फटका बसला होता.

गतवर्षी ८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा १३ लाख क्विंटलने साखरेचे उत्पादन वाढले. गतवर्षी हंगामाच्या शेवटी कोरोनाच्या संकटाचा सामना साखर कारखानदार, ऊसतोड मजूर यांना करावा लागला होता. यंदाही जवळपास तीच परिस्थिती होती. अशा संकटातच काही कारखान्यांचे हंगाम संपण्यास प्रारंभ झाला. सोनहिरा आणि राजारामबापू साखराळे हे दोन कारखाने उशिरापर्यंत सुरू राहिले. दोन्ही कारखान्यांनी नुकतेच गाळप बंद केल्यामुळे हंगाम संपला. जिल्ह्यात यंदा ८० लाख टन उसाचे गाळप होऊन ९५ लाख ८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...