Agriculture news in Marathi Sangli sugar production declined by 18 lakh quintals | Page 2 ||| Agrowon

सांगलीत साखरेचे उत्पादन १८ लाख क्विंटलने घटले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

सांगली ः जिल्ह्यातील यंदा गाळप हंगाम नुकताच पंधरा दिवसांपूर्वी संपला आहे. बारा साखर कारखान्यांनी ६६ लाख ९८ हजार ४०० टन उसाचे गाळप करून ८२ लाख ८७ हजार ५११ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. गतवर्षी ९९ लाख ८७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून यंदा हंगामात साखरेचे १८ लाख क्विंटलने घट झाली आहे.

सांगली ः जिल्ह्यातील यंदा गाळप हंगाम नुकताच पंधरा दिवसांपूर्वी संपला आहे. बारा साखर कारखान्यांनी ६६ लाख ९८ हजार ४०० टन उसाचे गाळप करून ८२ लाख ८७ हजार ५११ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. गतवर्षी ९९ लाख ८७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून यंदा हंगामात साखरेचे १८ लाख क्विंटलने घट झाली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी ९५ हजार ८२७ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड होती. दुष्काळी पट्ट्यात ताकारी, म्हैसाळ आणि टेंभूचे पाणी पोहोचत असल्याने या भागात देखील उसाचे क्षेत्र वाढू लागले आहे. वास्तविक पाहता, शेतकरी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करू लागले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. यंदा गेल्यावर्षीपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज साखर कारखान्यांनी व्यक्त केला होता. गेल्यावर्षी जिल्ह्यात ९९ लाख ८७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. जिल्ह्यातील सर्वाधिक साखरेचे उत्पादन मानले जात होते.

गतवर्षी दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. महापुराच्या काळात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यांसह परिसरातील ऊस बराच काळ पाण्याखाली होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

महापुरातून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा अतिवृष्टीमुळे देखील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३० टक्‍के क्षेत्रावरील ऊस बाधित झाला होता. परिणामी साखरेच्या उत्पादन घट निश्चित होती. महापूर आणि अतिवृष्टीमुळे साखर कारखानांच्या गळीत हंगाम एक महिन्याने उशिराने सुरू झाला. त्यामुळे कारखान्यांना गाळपासाठी स्पर्धा करावी लागणार असे चित्र होते.


इतर बातम्या
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात कृषी...औरंगाबाद : मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
परभणी, नांदेड, हिंगोलीत निविष्ठा...परभणी : कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विविध...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....