सांगलीत प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन

सांगलीत प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन
सांगलीत प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन

सांगली ः राज्यभर मराठा क्रांती आंदोलनाचा भडका उडाला असून, बुधवारी (ता. २५) सांगली येथे कृष्णाकाठी मराठा क्रांतीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पाण्यात उड्या घेत प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन केले. जिल्ह्यातील वाळवा, पलूस, शिराळा, कडेगावसह इतर तालुक्‍यात गाव बंद ठेऊन आंदोलन केले. सांगली तासगाव राज्यमार्गावर सकाळी टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला.

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून आंदोलन पेटलेले असताना सांगली, मिरज, कुपवाड शहरात महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे क्रांती मोर्चानेच शांततेचे आवाहन केले होते. जिल्ह्यात कालपासून जिल्हाभर आंदोलन तीव्र करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा दक्ष होती. सकाळपासूनच कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावर प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अपर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह दोन उपाधीक्षक, शहरातील सर्व निरीक्षक यांच्यासह सुमारे चारशे पोलिस बंदोबस्तात तैनात होते.

आंदोलन शांततेत करू, अशी त्यांनी ग्वाही दिली. त्यामुळे ठराविक कार्यकर्त्यांना नदीत प्रवेश देण्यात आला. त्यात डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, नितीन चव्हाण आदी कार्यकर्ते मराठा क्रांती मोर्चाचा लढा अखेरच्या श्‍वासापर्यंत सुरू ठेवण्याची शपथ घेतली. दरम्यान, मराठा आरक्षण देण्यावरुन सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध करत चिकुर्डे (ता. वाळवा) येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गाव बंदचे आवाहन केले. ऐतवडे बुद्रुक गाव कडकडीत बंद होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com