सांगलीत हळद प्रतिक्विंटल ४००० ते ७७०० रुपये

सांगलीत हळद प्रतिक्विंटल ४००० ते ७७०० रुपये
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ४००० ते ७७०० रुपये

सांगली ः येथील बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. २७) परपेठ हळदीची १७४४ क्विटंल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ४००० ते ७७००, तर सरासरी ५१०० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

गुळाची १३८१ क्विंटल आवक झाली होती. गुळास प्रतिक्विंटल ३३०० ते ४४०१ तर सरासरी ३८५० रुपये असा दर मिळाला. स्थानिक हळदीची २५५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ६००० ते ८०७० तर सरासरी ७००० रुपये असा दर होता.

विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची ६९३ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २८०० असा दर होता. बटाटाच्यी ६५६ क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये असा दर मिळाला. लसणाची १२० क्विंटल आवक होती. लसणास प्रतिक्विंटल ६००० ते ८००० रुपये असा दर मिळाला. मोसंबीची २४३० क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल २००० ते ५००० असा भाव मिळाला.

डाळिंब ६०० डझनाची आवक झाली होती. डाळिंबास प्रतिदहा किलोस ३०० ते १००० रुपये असा दर मिळाला. चिकूची १२२० किलो  आवक झाली होती. चिकूला प्रतिदहा किलोस ५०० ते ८०० असा दर होता. सीताफळाची १६० डझनाची आवक झाली असून त्यास प्रतिडझनास १०० ते ३०० रुपये दर होता. सफरचंद २२४२ पेटीची आवक झाली असून त्यास प्रतिपेटीस १००० ते २३०० रुपये असा दर होता. 

शिवाजी मंडईत गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक कमीच असून दर वराधले आहे. दोडक्याची २५ बॉक्सची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ६०० ते ७०० रुपये असा दर मिळाला. सिमला मिरचीची ४० पिशव्यांची आवक झाली होती. सिमला मिरचीस प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर होता. हिरव्या मिरचीची १०० ते १५० पोत्यांची आवक झाली होती. हिरव्या मिरचीस ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com