सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते १३१०० रुपये

सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते १३१०० रुपये
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते १३१०० रुपये

सांगली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागली आहे.  मंगळवारी (ता. ५) राजापुरी हळदीची १३०५८ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ६००० ते १३१०० तर सरासरी ९५५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

गुळाची ४१६६ क्विंटल आवक झाली होती. गुळास प्रतिक्विंटल २७२५ ते ३७०० तर सरासरी ३२१५ असा दर होता. परपेठ हळदीची २४४४ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ४५०० ते ७५०० तर सरासरी ६००० रुपये असा दर मिळाला. बाजरीची २० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १९५० ते २३५० तर सरासरी २१५० रुपये असा दर होता. गव्हाची ३५३ क्विंटक आवक झाली होती. गव्हास प्रतिक्विंटल २००० ते २८०० तर सरासरी २४०० रुपये असा दर मिळाला.

विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची ४६१५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २०० ते ६०० तर सरासरी ६५० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची १५०५ क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास प्रतिक्विंटल ६०० ते १२०० तर सरासरी ९५० रुपये असा दर मिळाला. लसणाची १८८ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ६५० ते १५०० तर सरासरी ११०० रुपये असा दर होता. द्राक्षाची ६६६ पेटीची आवक झाली होती. द्राक्ष प्रतिपेटीस ८०० ते १५० तर सरासरी १२५ रुपये असा दर मिळाला. चिक्कूची ३८ क्रेट आवक झाली होती चिक्कूस प्रति दहा किलोस १०० ते ३०० तर सरासरी १५० रुपये असा दर होता. डाळिंबाची ४६० क्रेट आवक झाली होती. डाळिंबास प्रति दहा किलोस १०० ते ३२५ तर सरासरी २०० रुपये असा दर होता. 

शिवाजी मंडईत वांग्याची २०० ते ३०० क्रेट आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस ४०० ते ५०० रुपये असा दर होता. ढोबळी मिरचीची ३०० ते ४०० पिशव्यांची आवक झाली होती. ढोबळी मिरचीस ४०० ते ५०० रुपये असा दर होता. फ्लॉवरची ५०० ते ६०० पिशव्यांची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. 

कोबीची १५० ते २०० पिशव्यांची आवक झाली. कोबीस प्रति दहा किलोस १०० ते १२० रुपये असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ५० पोती (एक पोते ४० ते ५० किलो प्रमाणे) आवक झाली होती. हिरव्या मिरचीस प्रति दहा किलोस ५०० ते ६०० रुपये असा दर होता. कोथिंबिरीची ५ ते ६ हजार पेंड्यांची आवक झाली असून, त्यास प्रति शेकडा ७०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. चाकवतीची १००० ते २००० पेंड्यांची आवक झाली होती. चाकवतीस प्रतिशेकडा १००० ते १२०० रुपये असा दर मिळाला. गवारीची ३०० किलोची आवक झाली होती. गवारीस प्रति दहा किलोस ७०० ते ८०० रुपये असा दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com