Agriculture news in Marathi Sangli will start Jaggery, turmeric deals in two days | Agrowon

सांगलीत दोन दिवसांत गूळ, हळदीचे सौदे सुरू करणार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

सांगली : ‘कोरोना’ मुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवताना बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने कृषी आणि उद्योग व्यवसायाला थोडी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाजार समितीमध्ये गूळ व हळदीचे सौदे दोन दिवसांत टोकन पद्धतीने सुरू करण्याचे नियोजन केल्याची माहिती सभापती दिनकर पाटील यांनी दिली. 

सांगली : ‘कोरोना’ मुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवताना बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने कृषी आणि उद्योग व्यवसायाला थोडी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाजार समितीमध्ये गूळ व हळदीचे सौदे दोन दिवसांत टोकन पद्धतीने सुरू करण्याचे नियोजन केल्याची माहिती सभापती दिनकर पाटील यांनी दिली. 

श्री. पाटील म्हणाले, लॉकडाऊनमुळे बाजार समितीची रोजची सुमारे २५ कोटींची उलाढाल ठप्प आहे. शेतकरी, व्यापारी, हमाल यांच्यावर संकट आले आहे. बाजार समितीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. सध्या मार्केट यार्डात होलसेल किराणा दुकाने सुरू आहेत. तेथे सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी केली जात आहे. कोल्हापूर रस्त्यावरील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केट सुरू आहे. तेथे भाजीपाल्यासाठी गर्दी होत असल्याचे पाहून समोरील संत निरंकारी मंडळाच्या जागेत तात्पुरती भाजीपाला विक्री सुरू केली आहे. फळ मार्केटमध्येही सोशल डिस्टन्सिंग बाबत सूचना दिल्या आहेत. तेथे येणाऱ्या वाहनांचे सॅनिटायझेशन केले जात आहे. 

श्री. पाटील पुढे म्हणाले, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दोन दिवसांत सांगलीत गूळ व हळदीचे सौदे पहिल्या टप्प्यात सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांची परवानगी घेतली जाईल. मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षितपणे सौदे सुरू ठेवण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील राहील. ज्याचा माल असेल तोच सौद्यावेळी पुढे येईल. तसेच खरेदीदार ठरावीक अंतरावर रांगेत उभे राहतील. सौद्यावेळी हमाल पाटीमधून प्रत्येकाला माल दाखवेल, अशी व्यवस्था केली जाईल. दुरूनच सौदे पार पाडले जातील. गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. मास्क व सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल. गूळ-हळदीच्या सौद्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बेदाणा सौदे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. 

असे होतील सौदे 
हळदीचा सौदा करते वेळी हमाल, बाजार समितीचा प्रतिनिधी, व्यापारी आणि ज्या शेतकऱ्याची हळद आहे तो शेतकरी असे हळदीचे काही नमुने घेऊन ते व्यापाऱ्यांना दाखवण्यात येतील, अशा पद्धतीत सौदे केले जाणार आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...