agriculture news in marathi, Sangli's dams are full of 70 percent | Page 2 ||| Agrowon

सांगलीतील धरणं ७० टक्के भरली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 जुलै 2018

सांगली  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शिराळा तालुक्‍याचा पश्‍चिम भागात चांदोली धरण परिसरात संततधार सुरू आहे. चोवीस तासांत धरण परिसरात ८४ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली असून, धरणात २५.३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणं ७० टक्के भरले आहे. संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी आले आहे.

सांगली  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शिराळा तालुक्‍याचा पश्‍चिम भागात चांदोली धरण परिसरात संततधार सुरू आहे. चोवीस तासांत धरण परिसरात ८४ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली असून, धरणात २५.३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणं ७० टक्के भरले आहे. संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी आले आहे.

जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. आटपाडी तालुक्‍यात सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली आहे. जत, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत मध्यम पाऊस झाला आहे. दुष्काळी तालुके वगळता इतर तालुक्‍यांत दमदार पाऊस सुरू आहे.
शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात गुरुवारपासून धुव्‍वाधार पाऊस सुरू असून, ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून, वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. यामुळे नदी काटावरील पिके पाण्यात गेली आहेत. कोकरुड-रेठरे (ता. शाहुवाडी) बंधारा पूल आणि येळापूर येथील मेणी ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने दहा गावांचा संपर्क तुटला आहे. जोरदार पावसाने भात शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

कोकरुड-रेठरे वारणामधील असणारा बंधारा पूल यावर्षी सलग दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याने रेठरे, कोतोली, गोंडोली, जोंधळेवाडी, भराडवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. शिराळा पश्‍चिम भागातील कोकरुडसह शेडगेवाडी, खिरवडे, हत्तेगाव येळापूर, मेणी, पाचगणी परिसरातील खरीप हंगामातील भात, ऊस पिके शेतातील पाण्यात गेली आहेत.

गेल्या २४ तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये
मिरज १२.५
जत ६.९
खानापूर-विटा १३.६
इस्लामपूर-वाळवा २१.२
तासगाव ७.४
शिराळा ६०.५
आटपाटी ०.७
कवठेमहांकाळ ६.७
पलूस १६.३
कडेगाव १८.६

 

इतर ताज्या घडामोडी
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...
झेंडू उत्पादक प्रतिकूल हवामानामुळे...ढेबेवाडी, जि. सातारा   : पावसाळी हवामान...
नगर : शेतकऱ्यांना लष्करी अळीचा...नगर  ः खरिपात लष्करी अळीमुळे ७० टक्के...
सरकारची दादागिरी थांबवण्याची वेळ आली...नगर  : सरकार ‘ईडी’ आणि इतर संस्थांच्या...
शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासाठी मूलभूत...वणी, जि. यवतमाळ   ः सिंचन सुविधात वाढ...
भाजप, शिवसेना जनतेला फसवतेय ः अशोक...भोकर, जि. नांदेड   ः भाजप आणि शिवसेनेची...
कांदा दरात घसरणीने शेतकऱ्यांत तीव्र...नाशिक : गेल्या आठवड्यात कांदा बाजारात ४५०...
...तर देशातील वस्त्रोद्योग क्षेत्र...नाशिक : मोदी सरकार प्रादेशिक व्यापक आर्थिक...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूला उठावसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कृषी आयुक्तांनी केली पीक कापणी...नगर  ः हमीदपूर (ता. नगर) येथे सुरू असलेल्या...
सोयाबीनची आवक सुरूनागपूर : बाजारात हंगामातील नव्या सोयाबीनची आवक...