agriculture news in marathi On Sanglis permit a firm selling jaggery in Karnataka | Page 3 ||| Agrowon

सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर गूळ विक्री...

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

संबंधित कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त हमाल तोलाईदारांनी सोमवार (ता. ८) बाजार समितीसमोर ठिय्या आंदोलन केले. संबंधित कंपनीवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. सचिवांनी कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. 

सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ ट्रेडिंग कंपनीकडून गूळ व्यापारी व बाजार समितीची दिशाभूल करून सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर गुळाचा व्यापार सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे बाजार समितीसह खरेदीदार, तोलाईदार आणि हमालांना फटका बसत आहे. समितीचा लाखो रुपयांचा सेसही बुडाला आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त हमाल तोलाईदारांनी सोमवार (ता. ८) बाजार समितीसमोर ठिय्या आंदोलन केले. संबंधित कंपनीवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. सचिवांनी कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. 

बाजार समिती आवारातील संतगोळ ट्रेडिंग कंपनीकडून गुळाची बाजारपेठेबाहेर परस्पर खरेदी आणि विक्री केली जाते. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून त्या कंपनीकडून परस्पर बाजारपेठेबाहेर मालाची विक्री होत आहे. गूळ बाजारास वेगळेच वळण लावले आहे. अनलोडिंग वारणी हमाल, अडतीचा हमाल, तोलाईदार, खरेदीदार, वारणी हमाल हे घटक बेकारीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी हमाल पंचायतीतर्फे बाजार समितीकडे तक्रार करण्यात आली. तसेच कारवाईसाठी वारंवार पाठपुरावा केला. परंतु त्यानंतरही कंपनीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. बाजार समितीने ठोस कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतल्याने हमाल- तोलाईदार यांचा असंतोष उफाळून आला. त्यामुळे आज जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने राज्य उपाध्यक्ष विकास मगदूम आणि बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. अन्य विभागातील हमालांनी तीन तास काम बंद ठेऊन पाठिंबा दिला. 

बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तेव्हा संबंधित अडत फर्मवर हमाल-तोलाईदार यांनी बहिष्कार टाकत हमाली तोलाईचे कामकाज न करण्याचा निर्णय घेतला. हमाल पंचायतचे उपाध्यक्ष रामचंद्र बंडगर, तोलाईदार सभेचे उपाध्यक्ष आदगोंडा गौंडाजे, इकबाल शेख, शामराव माने, विकास देवकते, रंगा काळेल, भारत गायकवाड आदी आंदोलनात सहभागी होते. 
 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
पाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः  शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...
अकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...
पुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...
येल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव  ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...
घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...
बलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः  गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...
घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...
पुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...
पाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...
मराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...
परभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...
‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...
सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
लासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...
नांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...