Agriculture news in Marathi, At the sangmeshwar, Ratnagiri in landslide threat due to rain | Agrowon

संगमेश्‍वर, रत्नागिरीत पावसामुळे जमिनीला भेगा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

रत्नागिरी ः मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून भूस्खलन, दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच आहे. संगमेश्‍वरमध्ये फुणगूसला डोंगर खाली आला असून, रत्नागिरी तालुक्यात हरचिरी-बौद्धवाडीसह, कोळंबे-वरचीवाडी, तोणदे येथे जमिनीला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील घरांना धोका निर्माण झाला आहे. स्थलांतराच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. येथील ग्रामस्थांना थांटलेला संसार घेऊन नातेवाईकांसह सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागणार आहे.

रत्नागिरी ः मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून भूस्खलन, दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच आहे. संगमेश्‍वरमध्ये फुणगूसला डोंगर खाली आला असून, रत्नागिरी तालुक्यात हरचिरी-बौद्धवाडीसह, कोळंबे-वरचीवाडी, तोणदे येथे जमिनीला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील घरांना धोका निर्माण झाला आहे. स्थलांतराच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. येथील ग्रामस्थांना थांटलेला संसार घेऊन नातेवाईकांसह सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागणार आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासांत सरासरी २८.११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड २८, दापोली ३४, खेड ३८, गुहागर २०, चिपळूण ३४, संगमेश्‍वर ३१, रत्नागिरी ११, लांजा १९, राजापूर ३८ मिमीची नोंद आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्हावासीय श्रावणसरींचा अनुभव घेत आहेत; परंतु जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत ११३ टक्के पावसाची नोंद झाली असून, त्याचे परिणाम डोंगरभागांमध्ये वसलेल्या गावांना बसले आहेत. फुणगूस खाडी भागातील थूळवाडी येथे काही दिवसांपूर्वीच जमिनीला भेगा होत्या. 

येथील डोंगर खचण्याच्या स्थितीत आहे. डोंगराच्या पायथ्याशी थुळवाडी आणि गुरववाडी आहे. तेथील २० ते २२ घरांना धोका निर्माण झाला आहे. डोंगर खचू लागल्यामुळे झाडे उन्मळून पडत आहेत. एक झाड घरावर कोसळल्याने पडवी जमीनदोस्त झाली. त्यामुळे स्थलांतर हाच पर्याय येथील ग्रामस्थांपुढे आहे.

पावसामुळे अशीच स्थिती रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी-बौद्धवाडी येथे निर्माण झाली आहे. जमिनीला मोठ्या भेगा गेल्या असून, तीन घरांना तडे गेले आहेत. या गावात पंधरा कुटुंबे आहेत. त्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. या परिसरातील कोळंबे वरचीवाडी आणि तोणदे परिसरातही भेगा गेल्या असून, एका कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. रत्नागिरी सुरळीत असली तरीही पश्‍चिम महाराष्ट्रातून येणारा भाजीपाला, दूध, इंधनाचा प्रश्‍न गंभीर झाल्यामुळे तीन दिवस नागरिकांची गैरसोय झाली. शुक्रवारी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात `कृषी, उद्योग, ऊर्जा’...पुणे : जिल्ह्याच्या २०२०-२१ च्या प्रारूप वार्षिक...
‘टेंभू’चे आवर्तन पुढील आठवड्यात...सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करा...
भंडारा : केवळ खरेदी केंद्रांवरच मिळतोय...भंडारा : महाविकास आघाडीकडून ५०० रुपयांचे बोनस आणि...
जळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीला...जळगाव : जिल्ह्यातील तीन केंद्रांमध्ये सोयाबीनची व...
सातारा जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील कांद्याची...
लातूर विभागात रब्बीत बारा लाख हेक्‍टरवर...लातूर : लातूर कृषी विभागांतर्गत लातूर,...
उद्योगांच्या दबावाने कापूस निर्यात बंदी...पुणे ः कापसाला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले दर...
गोंदिया : सौरकृषिपंप उभारणीचे कार्यादेश...गोंदिया  ः राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री...
जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा वनस्पतीचे...
औरंगाबादेत कांदा १००० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तापावर गुणकारी गुळवेलजळजळ होणे, बारीक ताप येणे, उष्णता वाढणे या...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीसर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९...
अंजीर-सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ...पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या ...
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...