Agriculture news in marathi Sangolya's percentage is more than 50 | Agrowon

सांगोल्या‍ची पैसेवारी ५० हून अधिक

टीम अॅग्रोवन
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

सांगोला, जि. सोलापूर : सांगोला तालुक्‍याची नजरअंदाज आकडेवारी जाहीर झाली आहे. या अंदाजानुसार तालुक्‍याची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त दिसून आली आहे.

सांगोला, जि. सोलापूर : सांगोला तालुक्‍याची नजरअंदाज आकडेवारी जाहीर झाली आहे. या अंदाजानुसार तालुक्‍याची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त दिसून आली आहे. यंदा दमदार पाऊस पडल्याने नजरअंदाज वाढला आहे. आता सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यंदा सांगोला तालुक्‍यात मान्सूनच्या पहिल्या दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. गेल्या २० ते २५ वर्षात पडला नाही, एवढा पाऊस तालुक्‍यात झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनके गावांत  पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने सांगोला तालुक्‍याला जबर फटका दिल्याने अंतिम पैसेवारी ही ४५ पैसे आली होती. सध्या सांगोला तालुक्‍यात पिकांची स्थिती उत्तम असल्याने चित्र बदलले आहे. 

यंदा प्रचंड प्रमाणात पाऊस झाला असला तरी नुकसानीमुळे उत्पादनात घट होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पावसाची परिस्थिती पाहता सांगोला तालुक्‍याचा नजर अंदाज हा ५० पैशापेक्षा जास्त आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात सुधारित पैसेवारी किती येते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण, सुधारित पैसेवारी बहुतांश वेळी अंतिम पैसेवारी असते. त्यात सहसा बदल होत नाहीत. आता ३१ ऑक्‍टोबरला सुधारित पैसेवारी, तर ३१ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे, यावरच पुढे शासनाची धोरणे आणि त्याचा लाभ मिळू शकतो. 

पावसाने नुकसान, उत्पादनात होणार घट

पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त असली, तरी सतत पडणारा पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे. हजारो हेक्‍टरवरील पिके अद्यापही कापणीच्या प्रतिक्षेत आहेत. शेतांमध्ये पाणी असल्याने पिके काढणीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नजरअंदाज पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आहे.


इतर ताज्या घडामोडी
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...
सांगली जिल्ह्यात खरिपाची दहा टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीस प्रारंभ...
आर्थिक दुर्बल घटकांना बियाणे वाटपाचे...नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध...
‘विष्णुपुरी’तून ४७१ क्सुसेकने विसर्गनांदेड : गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण...
परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांत...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये...
टोमॅटोवरील टुटा ॲबसोलुटा किडीची ओळख,...टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्तसांगली : विना परवाना खत विक्री प्रकल्पावर कृषी...