agriculture news in Marathi, sanjay Dhotre says, agriculture is important, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख वाट्याला येईल : संजय धोत्रे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी समृद्धीशी जोडली जातात. शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख तुमच्या वाट्याला येईल. त्यामुळेच शेतीसाठी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे मानवी इतिहासातील कतृत्व अमुल्य आहे, असे उद्गगार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी काढले. 

पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी समृद्धीशी जोडली जातात. शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख तुमच्या वाट्याला येईल. त्यामुळेच शेतीसाठी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे मानवी इतिहासातील कतृत्व अमुल्य आहे, असे उद्गगार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी काढले. 

कृषी व अन्न क्षेत्रातील नोबेल समकक्ष पुरस्कार विजेत्यांच्या कतृत्वाविषयी माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर यांनी लिहिलेल्या ''जागतिक अन्न पुरस्कार विजेत्यांची कतृत्वगाथा'' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. सकाळ प्रकाशनाने आयोजिलेल्या या सोहळ्यात व्यासपीठावर कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रतापराव साळवी, राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, गुजरात कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू एम.सी. वार्ष्णेय, ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, सकाळ प्रकाशनचे सरव्यवस्थापक आशुतोष रामगीर होते. 

खा. धोत्रे म्हणाले की, सकाळ माध्यम समूहाकडून समाजाच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये आघाडीचे काम होते आहे. या कामात कमालीचे परफेक्शन असल्याने सामाजिक कामांचा आदर्श वस्तुपाठ समोर ठेवला जात आहे. सकाळ किंवा अॅग्रोवनच्या माध्यमातून सुशासन, सकारात्मक विचार तसेच शेतकरी गाथांची उत्तम मांडणी होते आहे. 

माजी कुलगुरू डॉ. साळवी म्हणाले की, जगाच्या कृषी संशोधनात यातनामय वाटचाल करून काही संशोधकांनी अमूल्य काम केले आहे. त्यात डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचाही समावेश होतो. जागतिक कीर्तीच्या कृषी शास्त्रज्ञांचे कार्य मानवजातीला स्फूर्ती देणारे ठरले आहे.

‘‘व्हॉटसअप आणि फेसबुकच्या युगात नवी पिढी वाचनापासून दूर जात असताना जागतिक अन्नदिनाचे औचित्य साधत जागतिक शेतीच्या इतिहासातील महापुरुषांना पुस्तकरूपाने लोकांसमोर सकाळने आणले आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती आणि शेतीमधील समस्यांच्या जंजाळातून मार्ग काढून मजूर टंचाईच्या समस्यांवर उपाय शोधणाऱ्या शेतकऱ्यांची गाथा सांगणारा ‘अॅग्रोवन’चा दिवाळी अंकदेखील वाचकांच्या भेटीला येतो आहे,’’ असे अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी या वेळी नमूद केले. 

लेखक डॉ. नेरकर म्हणाले की, जागतिक कृषी व अन्न क्षेत्रातील नोबेल समकक्ष पुरस्कार मिळवणाऱ्या ४८ शास्त्रज्ञांचा आढावा मी लेखनातून घेतला आहे. यात डॉ. स्वामिनाथन, डॉ. वर्गीस कुरियन, गुरूदेवसिंह खुस, बद्रिनारायण बारवाले, सुरिंदरकुमार वासन, एस. व्ही. गुप्ता, संजय राजाराम अशा सात भारतीय शास्त्रज्ञांनी देखील जागतिक अन्न पुरस्कार मिळवल्याचा आम्हाला सतत अभिमान वाटतो.

प्रकाशनाला कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ तसेच शेती क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. सूत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केले. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...
उष्णतेच्या लाटेने पिके होरपळलीपुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात...
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
दूध रूपांतर योजनेचे १०० कोटी थकले पुणे: राज्यातील अतिरिक्त दुधाचे खरेदी करून भुकटी...
मॉन्सूनसाठी तयार होतेय पोषकस्थिती...पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात उन्हाच्या झळा असह्य पुणे: सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका...
नियमित कर्जदारांना द्या ५० हजाराचे...गोंदिया ः कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला...
शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा...मुंबईः राज्यात  ५० हजार उद्योग सुरु झाले....
कापसाचा हमीभाव २६० रुपयांनी वाढवा :...नवी दिल्लीः कापसाच्या हमीभावात गेल्या वर्षीच्या...
भेसळयुक्‍त धान बियाणे पुरविणाऱ्या...भंडारा  ः गेल्या हंगामात भेसळयुक्‍त...
जालन्यातील मोसंबी उत्पादकांना लॉकडाऊनचा...अंबड, जि. जालना : कोरोना संकट काळातील लॉकडाऊनचा...