महापुरातील घरांच्या `स्ट्रक्चरल ऑडिट`साठी अभियंत्यांची फौज मैदानात उतरवू ः संजय पाटील

खासदार संजय पाटील
खासदार संजय पाटील

सांगली  : कृष्णा-वारणा नद्यांच्या महापुराने घरांची पडझड होणार आहे. लोकांनी सुरक्षिततेची काळजी घेऊनच घरी जावे. त्यासाठी घरांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट आवश्‍यक असून त्याकामी शहरातील सर्व अभियंत्यांना मैदानात उतरवले जाईल. आम्ही त्यांना तसे आवाहन करू, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी येथे दिली. 

श्री. पाटील म्हणाले, की महापूर ओसरतोय, आता आणखी मोठे आव्हान उभे राहणार आहे. लोक घरी परत जात असताना सर्वांनीच खूप काळजी घेण्याची गरज आहे. लोकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. औषधांची उपलब्धता आहे. यंत्रणा ताकदीने काम करत असून आम्ही संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहोत. पूरग्रस्तांशी सतत संवाद सुरू आहे. आवश्‍यक तेथे वस्तू पोच होत आहेत. राज्यातील मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवादातून या संकटावर मात करण्यासाठी साऱ्यांनीच ताकद लावली आहे. सांगलीकर धीराचे आहेत. ते खचणार नाहीत. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज आणि कडेगाव तालुक्‍यांतील जनतेच्या पाठीशी संपूर्ण राज्य उभे राहिले आहे. राज्य शासनाकडून अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी संपर्कात आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन येथे तळ ठोकून आहेत. मदतीत कोणतीही कमतरता होणार नाही.

ते म्हणाले, की आता वेळ आहे घर सावरण्याची. त्यासाठी लोकांनी घरांची संपूर्ण तपासणी करून घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांशी मीही बोललो आहे. स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यासाठी अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आम्ही करतो आहोत. वालचंद अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यात उतरतील. लोकांनी आता सुरक्षिततेची काळजी अधिक घेण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com