agriculture news in Marathi sanjivkumar tomar says honey bee have important role in agri production improve Maharashtra | Agrowon

शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा: संजीवकुमार तोमर

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. यासाठी काटेकोर व्यवस्थापन आवश्‍यक आहे. शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी मधमाशांचा मोठा वाटा आहे, यासाठी त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन बागपत (उत्तरप्रदेश) येथील प्रगतशील मधमाशीपालक संजीवकुमार तोमर यांनी केले. 

नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. यासाठी काटेकोर व्यवस्थापन आवश्‍यक आहे. शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी मधमाशांचा मोठा वाटा आहे, यासाठी त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन बागपत (उत्तरप्रदेश) येथील प्रगतशील मधमाशीपालक संजीवकुमार तोमर यांनी केले. 

पूर्वा केमटेक प्रा. लि. व ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा. लि. यांच्या तर्फे होणाऱ्या ‘मधुक्रांती २०१९’ या पहिल्या दिवसाच्या परिसंवादात ते बोलत होते. चर्चासत्राचे प्रमुख महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. व्ही.एस. पवार हे होते. श्री. तोमर म्हणाले, ‘‘डाळिंब पिकाला फूल आले पण फळ येण्यासाठी परागीभवन खूप महत्त्वाचे असते. मधमाश्‍यांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळेच पृथ्वीतलावरील विविध वनस्पतींच्या जैविक विविधतेचे हिरवेपण अनुभवू शकतो. त्यामुळे मधमाशी पालन व्यवसाय वाढून चळवळ उभी राहावी.’’ 

या परिसंवादाचे दुसरे वक्ते अमरावती येथील मधमाशी पालक विवेक खालोकर म्हणाले, ‘‘मधमाशी पालन करताना शास्त्रीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना आहेत. मात्र फक्त अनुदानासाठी काम सुरू न करता संघटितपणे या क्लस्टर तयार करून काम उभे करावे. मधाच्या थेट विक्रीसह या व्यवसायात स्थिर होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागते. मात्र, मधाचे मार्केटिंग व ब्रँडिंग केल्यास व्यवसाय वाढविण्यासाठी अनेक संधी आहेत.’’

या वेळी उपस्थितांनी काही शंका व प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाचे संबंधित तज्ज्ञांनी शंकानिरसन केले. या परिसंवादात तज्ज्ञांसमवेत सामूहिक संवाद व चर्चा संयोजकांनी घडवून आणली. या वेळी ‘सुप्रकृती मधुशाला’, नाशिकचे संचालक डॉ. तुकाराम निकम, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी सहयोगी संशोधन संचालक डॉ. जे के. पुरकर, कीटकशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. बी. एस. शेवाळे, सीबीआरटीआय पुणे चे उपसंचालक एस.एम पोकरे, विद्यानंद आहिरे, डॉ. बी. बी. पवार, डॉ. भास्कर गायकवाड आदी मान्यवर तर मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत केंद्रांवरील...औरंगाबाद : बाजारात हमी दरापेक्षा कमी दराने तुरीची...
ग्रामीण भागात आरोग्यसेवा द्या : भगतसिंह...नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान...
रत्नागिरी दूध संघाकडून १ कोटी २० लाख...रत्नागिरी : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील चाळीस...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगली, कोल्हापूरसाठी विशेष पॅकेज : डॉ...सांगली : ‘‘महापूराने सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे...
वीज दरवाढीबाबत चार फेब्रुवारीला हरकती...मसूर, जि. सातारा ः महावितरणचा २०.४ टक्के वीज...
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही...मेढा, जि. सातारा : नियमित कर्जफेड करणाऱ्या...
कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरितरत्न...अकोला  ः नवी दिल्ली येथील अखिल भारतीय कृषी...
अकोले तालुका गैरव्यवहार प्रकरणी तीन...नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व...
मोहोळ येथे शेतकऱ्यांनी बॅंक...मोहोळ, जि. सोलापूर : अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍...
बॅंकांनी रोखली गटशेतीची वाट :...नागपूर  ः गटशेती योजनेचे अनुदान ६०...
हवामान बदल सहनशील वाण संशोधनाला मिळणार...परभणी: बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन...
ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीयदिनी...मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत...
अल्पसंख्यांक समाजामुळे सत्ता परिवर्तन ः...मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम...
शंकरराव चव्हाण यांच्या...नांदेड ः नांदेडचे नगराध्यक्ष ते...