नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
बातम्या
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्यांचा मोठा वाटा: संजीवकुमार तोमर
नाशिक: मधमाश्यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. यासाठी काटेकोर व्यवस्थापन आवश्यक आहे. शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी मधमाशांचा मोठा वाटा आहे, यासाठी त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन बागपत (उत्तरप्रदेश) येथील प्रगतशील मधमाशीपालक संजीवकुमार तोमर यांनी केले.
नाशिक: मधमाश्यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. यासाठी काटेकोर व्यवस्थापन आवश्यक आहे. शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी मधमाशांचा मोठा वाटा आहे, यासाठी त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन बागपत (उत्तरप्रदेश) येथील प्रगतशील मधमाशीपालक संजीवकुमार तोमर यांनी केले.
पूर्वा केमटेक प्रा. लि. व ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा. लि. यांच्या तर्फे होणाऱ्या ‘मधुक्रांती २०१९’ या पहिल्या दिवसाच्या परिसंवादात ते बोलत होते. चर्चासत्राचे प्रमुख महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. व्ही.एस. पवार हे होते. श्री. तोमर म्हणाले, ‘‘डाळिंब पिकाला फूल आले पण फळ येण्यासाठी परागीभवन खूप महत्त्वाचे असते. मधमाश्यांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळेच पृथ्वीतलावरील विविध वनस्पतींच्या जैविक विविधतेचे हिरवेपण अनुभवू शकतो. त्यामुळे मधमाशी पालन व्यवसाय वाढून चळवळ उभी राहावी.’’
या परिसंवादाचे दुसरे वक्ते अमरावती येथील मधमाशी पालक विवेक खालोकर म्हणाले, ‘‘मधमाशी पालन करताना शास्त्रीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना आहेत. मात्र फक्त अनुदानासाठी काम सुरू न करता संघटितपणे या क्लस्टर तयार करून काम उभे करावे. मधाच्या थेट विक्रीसह या व्यवसायात स्थिर होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागते. मात्र, मधाचे मार्केटिंग व ब्रँडिंग केल्यास व्यवसाय वाढविण्यासाठी अनेक संधी आहेत.’’
या वेळी उपस्थितांनी काही शंका व प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाचे संबंधित तज्ज्ञांनी शंकानिरसन केले. या परिसंवादात तज्ज्ञांसमवेत सामूहिक संवाद व चर्चा संयोजकांनी घडवून आणली. या वेळी ‘सुप्रकृती मधुशाला’, नाशिकचे संचालक डॉ. तुकाराम निकम, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी सहयोगी संशोधन संचालक डॉ. जे के. पुरकर, कीटकशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. बी. एस. शेवाळे, सीबीआरटीआय पुणे चे उपसंचालक एस.एम पोकरे, विद्यानंद आहिरे, डॉ. बी. बी. पवार, डॉ. भास्कर गायकवाड आदी मान्यवर तर मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
- 1 of 1502
- ››