agriculture news in marathi, Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohala to begin from today | Agrowon

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 जुलै 2018

आळंदी ः कपाळी केसरी गंध, गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून आलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्यांतील हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरीच्या दिशेने आज, शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी होणार आहे.

आळंदी ः कपाळी केसरी गंध, गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून आलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्यांतील हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरीच्या दिशेने आज, शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी होणार आहे.

माउलींच्या समाधी मंदिरात पहाटे सव्वादोनला काकडा आरती, पवमान अभिषेक झाल्यानंतर पहाटे चार ते बारापर्यंत माउलींचे समाधी दर्शन भाविकांना खुले ठेवण्यात येईल. दरम्यानच्या काळात सकाळी नऊपर्यंत भाविकांच्या महापूजा सुरू राहणार आहेत. नऊ ते अकरा वीणा मंडपात कीर्तन होईल. दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत माउलींच्या नैवेद्यासाठी दर्शनबारी बंद ठेवून समाधी मंदिराचा गाभारा स्वच्छ करून महानैवेद्य दाखविला जाईल. यानंतर पुन्हा दुपारी साडेबारा ते दोन माउलींच्या समाधीचे दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे.

दुपारी अडीच ते साडेतीनच्या सुमारास रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला जाईल. या वेळी माउलींच्या समाधीवर ब्रम्हवृंदाच्या वतीने पोशाख चढविण्यात येणार आहे. पोशाखानंतर गुरू हैबतबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची आरती, त्यानंतर संस्थानच्या वतीने आरती होईल. त्यानंतर माउलींच्या पादुका प्रस्थानासाठी वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत स्थानापन्न करण्यात येतील. त्यानंतर माउलींच्या पालखीचे वीणामंडपातून सायंकाळी सहाच्या दरम्यान देऊळवाड्यातून पंढरीकडे प्रस्थान होईल. पालखी देऊळवाड्यातून बाहेर पडल्यानंतर नगरप्रदक्षिणा करून रात्री आजोळघरी विसावेल. 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...