मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मान
माउलींची सेवा करण्याची यंदा संधी मिळाल्याने धन्य झालो.
- पंडितराव रानवडे, बैलजोडी मालक
माळीनगर, जि. सोलापूर : संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी रथ ओढण्याचा मान यंदा आळंदी येथील पंडितराव कृष्णाजी रानवडे यांच्या ‘सर्जा-राजा’ बैलजोडीला मिळाला आहे.
माउलींचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी २५ जूनला आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे. माउलींच्या बैलजोडी सेवा निवड समितीने ही निवड केली आहे. वरखडे, कुऱ्हाडे, घुंडरे, रानवडे, भोसले, वहिले अशी आडनावे असलेली आळंदीतील सहा कुटुंबे माउलींच्या रथासाठी बैलजोडीची सेवा देतात. त्यापैकी वरखडे, कुऱ्हाडे, घुंडरे, रानवडे या चार कुटुंबांना चक्राकार (रोटेशन) पद्धतीने सेवा करण्याची संधी मिळते. या कुटुंबांची आलटून पालटून चार वर्षे पूर्ण झाल्यावर पाचव्या वर्षी एकदा भोसले व त्यापुढील पाचव्या वर्षी वहिले कुटुंबास बैलजोडी सेवेची संधी उपलब्ध होते.
माउलींच्या रथास दरवर्षी बैलजोडी उपलब्ध करून देण्यासाठी आळंदीकरांची सात सदस्यांची बैलजोडी सेवा निवड समिती आहे. रोटेशनप्रमाणे ज्या आडनावाच्या कुटुंबाचा क्रमांक आहे. केवळ त्यांच्यातील सदस्यच बैलजोडी सेवा देण्यासाठी अर्ज करतात. रोटेशन पद्धतीने निवड होत असल्याने अन्य आडनावाच्या कुटुंबांनी अर्ज करायचे नाहीत, असा शिरस्ता आहे. त्यानुसार यंदा रानवडे कुटुंबाकडे सेवा देण्याचा मान होता. त्यामुळे पंडितराव रानवडे, शैलेंद्र रानवडे, रवींद्र रानवडे, पांडुरंग रानवडे यांनी निवड समितीकडे अर्ज दाखल केले होते. त्यातून पंडितराव रानवडे यांच्या बैलजोडीस सर्वानुमते संधी मिळाली आहे. आळंदी ते पंढरपूर व पुन्हा परतीच्या प्रवासाच्या वाटचालीत एकच बैलजोडी सेवा देते.
गेल्या ३५ वर्षांपासून रोटेशनप्रमाणे माउलींच्या रथासाठी बैलजोडी सेवा देण्याची आळंदीकरांची परंपरा चालू आहे, अशी माहिती आळंदी येथील राजाभाऊ चोपदार यांनी दिली.
योग्य बैलजोडी निवडण्याची जबाबदारी निवड समितीची असते. वाद न होता पारदर्शीपणे बैलजोडी निवडली जाते, अशी माहिती बैलजोडी सेवा निवड समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी दिली.
- 1 of 1022
- ››