agriculture news in marathi, Sant Eknath Maharaj, Paithan | Agrowon

संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

पैठण, जि. औरंगाबाद : पैठण येथील शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या ४२० व्या नाथषष्ठीनिमित्ताने राज्यातील चारशे ते पाचशे दिंड्यांच्या माध्यमातून आलेल्या भाविकांनी मंगळवारी (ता.२६) श्री संत एकनाथ महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली.

पैठण, जि. औरंगाबाद : पैठण येथील शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या ४२० व्या नाथषष्ठीनिमित्ताने राज्यातील चारशे ते पाचशे दिंड्यांच्या माध्यमातून आलेल्या भाविकांनी मंगळवारी (ता.२६) श्री संत एकनाथ महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली.

मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता षष्ठीची नाथवंशजाची निर्याण दिंडी गावातील नाथ मंदिरातून काढण्यात आली. या दिंडीत अक्षदा दिलेले सर्व मानकरी सहभागी झाले होते. ही दिंडी वाळवंटातून बाहेरील नाथ मंदिरात नेण्यात आली. या ठिकाणी ‘अवघेचे त्रैलौक्य, आनंदाचे आता’ या अभंगावर वारकऱ्यांनी ठेका धरला होता. नाथषष्ठी यात्रेस तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर सुरवात झाली.

मंगळवारी सकाळपासूनच शहरात ‘भानुदास एकनाथ’ या जयघोषात लहान मोठ्या दिंड्या दाखल झाल्या असून, मंगळवार (ता.२६) ते गुरुवार (ता.२८) या तीन दिवसांच्या कालावधीत संत एकनाथ महाराज यांचा नाथषष्ठी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. त्याअनुषंगाने शासकीय यंत्रणेकडून भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यावर्षी यात्रेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दर्शनासाठी महिला व पुरुषांची दर्शनबारी वेगळी करण्यात आली आहे. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पैठण नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुरज लोळगे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव आदी प्रयत्न करत आहेत.

इतर बातम्या
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...